Headlines

Hema Malini : ‘आंदोलनातून काहीही साध्य होणार नाही’, CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया


Hema Malini : हेमा मालिनी यांनी सीजेपी आंदोलनावर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Hema Malini On CJP Protest
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सोमवारी नवी दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हजेरी लावली. अधिवेशनानंतर, ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलकांबद्दल त्या माध्यमांशी बोलताना दिसल्या. अशा प्रकारे आंदोलन केल्यानं काहीही साध्य होणार नाही, असं हेमा मालिनी म्हणाल्या.

काय म्हणाल्या हेमा मालिनी?

ANIनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हेमा मालिनी म्हणतायत की, ‘जर एखादी अडचण असेल, तर आपण त्यावर सखोल चर्चा केली पाहिजे. अशा प्रकारे आंदोलन केल्यानं काहीही साध्य होणार नाही आणि देशातील तरुण आणि शिक्षण व्यवस्थेसाठी आमचं मोदी सरकार आमच्यासोबत आहे. त्यांनी त्यासाठी खूप काम केलं आहे.’

Gulabrao Patil On Delhi CJP Protest | दिल्लीतील आंदोलनावरून गुलाबराव पाटलांचा सरकारला सल्ला

हेमा मालिनी पुढे म्हणाल्या, ‘तुम्ही सध्या करत असलेल्या आंदोलनांना काही अर्थ नाही. मी एवढेच म्हणेन की, आपण त्या अडचणी चर्चेद्वारे सोडवल्या पाहिजेत…तुम्ही विद्यार्थ्यांना सामील करून घ्या, तुम्ही त्यांच्या मतांची दिशाभूल करू नका. तुम्ही अडचणी योग्यरित्या समजावून सांगितली पाहिजे. काहीतरी चांगलं करताना त्यांना आनंद झाला पाहिजे.’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर हेमा मालिनी यांनी भाष्य करण्यास नकार दिला.
परीक्षेतील अनियमिततेवरून शिक्षणमंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हजारो आंदोलकांनी येथील पार्लमेंट स्ट्रीटजवळ जमून संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज केला होता.

Maharashtra TimesCJP Protest : चिन्मयी सुमीत मुलांसह सीजेपी आंदोलनासाठी दिल्लीत, दिग्दर्शक अभिजित पानसेही सहभागी, Video व्हायरल

प्रकाश राज, शबाना आझमी यांचा पाठिंबा

रविवारी, अभिनेते प्रकाश राज, शबाना आझमी आणि पूनम पांडे यांनी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जंतर मंतर येथे हजेरी लावली. सोमवारी सकाळी, शबाना आणि प्रकाश यांनी सोनम वांगचुक यांच्यासोबत अनिश्चित काळासाठी उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांचं उपोषण सोडण्यास मदत केली. हृतिक रोशन, सोनाक्षी सिन्हा आणि चिन्मयी श्रीपदा यांसारख्या सेलिब्रिटींनी सोनम वांगचुक यांना ऑनलाइन पाठिंबा दर्शवला आहे. सोनम वांगचुक सध्या सफदरजंग रुग्णालयात दाखल आहेत. २१ दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यावर दीपकेनं १८ जुलै रोजी उपोषण सुरू केलं होतं. वेगानं वाढणाऱ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, सीजेपीचे प्रतिनिधी आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी आज केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांची भेट घेतली.