Headlines

H-1B Visa Fee Hike : १ लाख डॉलरहून जास्त व्हिसा फी आकारण्याचा विचार, भारतीयांवर काय परिणाम होणार? – trump moves to hike h-1b visa fee to over $100,000, effects on indians explained


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#H1BVisa #US #indians #immigrantionहजारो भारतीय विद्यार्थी, सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, डॉक्टर, संशोधक आणि तंत्रज्ञ असे अमेरिकेत काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आकडा सगळं गणितच बदलू शकतो. अगदी अचूक सांगायचे तर एक लाख तीन हजार दोनशे पासष्ट डॉलर्स.. म्हणजेच जवळपास ९९ लाख रुपये.. अमेरिकेत सध्या प्रस्तावित H-1B विसा फीची चर्चा सुरू आहे, तो हाच आकडा आहे. आणि हो, पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट अगदी स्पष्ट करूया. हे फक्त एखादे व्हिसा शुल्क महाग होण्यापुरते मर्यादित नाही. जर हा प्रस्ताव जसाच्या तसा लागू झाला, तर अमेरिकन कंपन्या कोणाला कामावर घेण्यास तयार आहेत, भारतीय व्यावसायिक त्यांचे करिअर कुठे घडवतील आणि कंपन्या पूर्वीच्याच प्रमाणात परदेशी कर्मचाऱ्यांना स्पॉन्सर करणे सुरू ठेवतील की नाही, हे सर्वच बदलू शकते. त्यामुळे प्रश्न असा आहे की नक्की घडतंय काय? अमेरिका १ लाख डॉलरपेक्षा जास्त शुल्क लादण्याचा विचार का करत आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचा भारतीयांवर काय परिणाम होईल? चला, हे समजून घेऊयात…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत