Success Story: गेल्या काही वर्षांपासून गुच्चीला ‘श्रीमंतांचा ब्रँड’ म्हणून ओळखले जाते, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका लिफ्टमध्ये काम करणाऱ्याने हा ब्रँड सुरू केलेला. या ब्रँडची स्थापना गुच्चिओ गुच्ची यांनी केली, जे एकेकाळी एका हॉटेलमध्ये लिफ्ट मॅन आणि पोर्टर म्हणून काम करत होते.

एका छोट्या दुकानातून सुरुवात केली
गुचिओ गुची नावाच्या एका व्यक्तीने या ब्रँडची स्थापना केली होती, जे एकेकाळी लंडनच्या एका हॉटेलमध्ये लिफ्टमन आणि पोर्टर म्हणून काम करायचे. हॉटेलमध्ये काही काळ काम केल्यानंतर गुची एका फॅशन कंपनीत रुजू झाले आणि पाहुण्यांच्या फॅशन सेन्सने इतके प्रभावित झाले की त्यांनी स्वतःचा फॅशन लेबल सुरू करण्याचा निर्धार केला.
गुचिओ गुची कोण होते?
26 मार्च, 1881 रोजी इटलीतील फ्लॉरेन्स शहरात जन्मलेल्या गुच्चिओ गुच्ची यांचा किस्सा केवळ यशस्वी व्यवसायाबद्दल नाही, तर संघर्ष आणि अद्वितीय ध्यासाचे तेजस्वी उदाहरण आहे. गुच्ची यांना लहानपणापासूनच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आणि परिणामी, चांगल्या आयुष्याच्या शोधात घर सोडून लंडनला पोहोचले.
एका हॉटेलमधून मिळाली प्रेरणा
1899 मध्ये गुच्ची एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये पोर्टरचं काम करू लागले आणि याच ठिकाणी त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन घडले. या आलिशान हॉटेलमध्ये जगभरातील श्रीमंत लोक, राजघराण्यातील व्यक्ती आणि प्रतिष्ठित व्यावसायिक यांची नेहमीच वर्दळ असायची. या हॉटेलला भेट देणाऱ्या श्रीमंत लोकांची जीवनशैली आणि शाही थाट पाहून गुच्चिओला उच्चभ्रू वर्गाची खरी ओळख बनू शकेल, असा एक प्रीमियम ब्रँड सुरू करायची कल्पना सुचली. (प्रातिनिधिक फोटो)
आपली अख्खी बचत गुंतवून सुरू केला गुच्ची
आपली हीच कल्पना सातत्यात उतरवण्याचा निर्धार आणि अनेक वर्षांच्या अनुभवानंतर गुच्चिओ आपल्या मूळ गावी फ्लॉरेन्सला परतले, जिथे त्यांनी साल 1921 मध्ये आपली अख्खी कमाई गुंतवून ‘गुची’ ब्रँड सुरू केला. उत्कृष्ट चामड्याच्या बॅगा, सुटकेस आणि महागड्या घोडेस्वारीच्या उपकरणांनी सुरुवात केली. गुणवत्ता आणि कारागिरी ही त्यांच्या ब्रँडचे तत्व तडजोड न करणारे होते. जे हळूहळू श्रीमंतांमध्ये प्रतिष्ठेचे प्रतीक बनले. मात्र, दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने इटलीमध्ये कच्च्या माल आणि चामड्याची तीव्र टंचाई निर्माण झाली ज्यामुळे ब्रँडसमोर आव्हानात्मक ठरले, पण त्यांनी चिकाटीने आपली कल्पकता वापरली.
चामड्याच्या कमतरतेमुळेही काम नाही थांबवले
चामड्याच्या तुटवड्यामुळे मजबूत कॅनव्हास आणि बांबू वापरून बॅग बनवणे सुरू केले, जी आजही फॅशन जगतात लोकप्रिय आहे. फॅशन जगतात नावलौकिक मिळवलेल्या गुच्चिओ यांचे 2 जानेवारी 1953 रोजी निधन झाल्यावर कौटुंबिक वाद निर्माण झाले असले पण, त्यामुळे त्यांच्या ब्रँडला अजिबात धक्का बसला नाही. एका हॉटेलमधील सामान्य कर्मचाऱ्यापासून फॅशन विश्वात इतके मोठे स्थान मिळवलेल्या गुच्चिओ गुच्चीची कहाणी आपल्याला शिकवते की, योग्य विचार आणि कठोर परिश्रमातून परिस्थिती कितीही वाईट असली तरी, जागतिक ट्रेंड बदलू शकता.
दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरून गुच्चीची झेप
1990 च्या दशकात डिझायनर टॉम फोर्ड कंपनीत सामील झाले आणि कंपनीच्या डिझाइन्समध्ये आमूलाग्र बदल घडवला, ज्याने फॅशन विश्वात गुच्चीला नवीन ओळख मिळाली.गुच्चीच्या जीनियस जीन्सने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवले. 1990 च्या दशकात विक्रमी 2.43 लाख जीनियस जीन्स विकल्या गेल्या, ज्या त्यावेळी जगातील सर्वात महागड्या जीन्स होत्या.
पण गुच्ची इतकं महाग का?
यामध्ये अनेक घटक आहे – सर्वप्रथम मानसशास्त्र. यानुसार जेव्हा एखादी वस्तू महाग होते, तेव्हा त्याची मागणी कमी होते, पण लक्झरी ब्रँड्सना ‘वेब्लेन इफेक्ट’ लागू होतो. वेब्लेन वस्तू म्हणजे अशा वस्तू, ज्यांची किंमत जितकी जास्त, तितक्या जास्त श्रीमंत लोकांना खरेदी करण्याची इच्छा असते. अशाप्रकारे, गुच्चीने आपल्या बॅगची किंमत 10,000 रुपयांपर्यंत कमी केली, तर सामान्य लोक खरेदी करू शकतील पण श्रीमंत लोक, जे ब्रँडचे खरे ग्राहक आहेत, खरेदी करणे थांबवतील, कारण ती त्यांच्यासाठी संपत्तीचे प्रतीक राहणार नाही.
गुच्चीचे उत्तम दर्जाचे कामकाज
दुसरे म्हणजे गुच्ची आपली बहुतेक उत्पादने ‘लिमिटेड एडिशन्स’मध्ये तयार करते, ज्यामुळे आपोआपच उत्पादनांच्या किंमती वाढतात. पण गुच्चीला इतके महाग बनवणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारसा. गुच्चीच्या बहुतेक बॅग्स आजही इटलीतील फ्लॉरेन्स येथील पारंपरिक कारागिरांकडून हाताने बनवल्या जातात ज्यामध्ये चामड्याचा दर्जा, शिलाई आणि फिनिशिंग इतके बारकाईने केलेले असते की एक बॅग बनवायला अनेक दिवस लागतात.

