Headlines

pune shirur gang rape shirur pune crime news 22 year old drugged assaulted


पुण्यातील शिरूर शहरात एका 22 वर्षीय तरुणीवर अमली पदार्थ देऊन सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून तरुणीला एका लॉजमध्ये डांबून ठेवण्यात आले आणि जबरदस्तीने अमली पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार कर

.

आरोपीने तरुणीला चांगल्या पगाराचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून कारमधून शिरूर येथे नेले. त्यानंतर 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान शिरूर हद्दीतील एका लॉजमध्ये तिला डांबून ठेवले. या कालावधीत तिला जबरदस्तीने नशा देणारी पांढरी पावडर खायला देऊन, तिच्या इच्छेविरुद्ध सामूहिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे, आरोपींनी तिला मारहाण, शिवीगाळ आणि जिवे मारण्याची दमदाटीही केली. या भयावह घटनेनंतर पीडित तरुणीने तात्काळ शिरूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण सात जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.

या संदर्भातील या देखील बातम्या वाचा रायगडमध्ये संतापजनक प्रकार!:जन्मदात्या बापाकडूनच पोटच्या लेकीवर लैंगिक अत्याचार, आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

रायगड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका जन्मदात्या बापानेच आपल्या दोन अल्पवयीन सख्ख्या मुलींवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या भयंकर घटनेची माहिती मिळताच पीडित मुलींच्या आईने आपल्या पतीविरोधात माणगाव पोलिस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या नराधम बापाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. वाचा सविस्तर

जुन्नर हादरले:चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या, संशयित पोलिसांच्या ताब्यात, नराधमाला फाशीच द्या- ग्रामस्थ

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अवघ्या 9 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. इथे सविस्तर वाचा ‘बघा बघा, मी CCTV मध्ये दिसतोय…’:चिमुरडीवर अत्याचार करून गावकऱ्यांसोबतच शोध घेत बसला, एका वाक्याने नराधमाचे फुटले बिंग

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे एका निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. हे पाशवी कृत्य केल्यानंतर आरोपी गावकऱ्यांमध्ये मिसळून मुलीला शोधण्याचे नाटक करत होता. मात्र, सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पाहताना त्याने मारलेली ‘बघा बघा, मी सीसीटीव्हीत दिसतोय’ ही अतिशहाणपणाची बढाईच त्याच्या अंगलट आली आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे या नराधमाच्या मुसक्या आवळल्या गेल्या. इथे सविस्तर वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत