सरकारी गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने SGB Redeem संबंधित कॅलेंडर जाहीर केले आहे. या कॅलेंडरमध्ये एसजीबी मिळवण्याची रक्कम कधीपर्यंत मिळेल या संदर्भात तारखा पुरवण्यात आल्या आहेत. या कॅलेंडरमध्ये Premature Redemption आणि Request Window अशा दोन वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या आहेत. जाणून घ्या, या तारखांचा नेमका अर्थ काय?

SGB म्हणजे Sovereign Gold Bond . या गुंतवणुकीत गुंतवणूकदार प्रत्यक्ष सोने विकत घेण्यापेक्षा सरकारी गोल्ड बाँड विकत घेतो. मुळात, गुंतवणूकदारांना हे गोल्ड बाँड 8 वर्षांनी विकता येतात. पण जर एखाद्या गुंतवणूकदाराला 8 वर्ष पूर्ण होण्याअगोदरच विकायचे असल्यास तशी मुभा देण्यात आली आहे. गुंतवणूकदाराला किमान पाच वर्षांसाठी तरी बाँड स्वतःजवळ ठेवावे लागतात, त्यानंतर ते सरकारला परत करता येऊ शकते. एकंदरीत, प्रिमॅच्युअर रिडेम्प्शन म्हणजे 8 वर्षे पूर्ण करण्यापेक्षा 5 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सरकारी गोल्ड बाँड सरकारला परत करून सोन्याच्या चालू रक्कमेने किंमत Redeem करणे. RBI ने जाहीर केलेल्या या तारखा याच Premature Redemption संदर्भात आहेत.
Request Window म्हणजे काय?
भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या कॅलेंडरमध्ये प्रिमॅच्युअर रिडेम्प्शनसह Request Window नावाने काही तारखांची नोंद आहे. या दोन वेगवेगळ्या तारखांमुळे गुंतवणूकदारांचा गोंधळ उडाला आहे. Premature Redemption संदर्भात असणाऱ्या तारखेत गुंतवणूकदाराला SGB रिडीम करता येतो. पण त्यासाठी गुंतवणूकदाराला आधी अर्ज करावे लागते आणि ते अर्ज करण्यासाठी एक ठराविक मुदत देण्यात आली आहे ती मुदत म्हणजे रिक्वेस्ट विंडो म्हणून नेमण्यात आलेल्या तारखा.
Request Window चुकली तर…
जर तुम्ही SGB मध्ये गुंतवणूक केलीये तर प्रिमॅच्युअर रिडेम्प्शन च्या तारखेपेक्षा Request Window ची तारीख तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. जर तुम्ही रिक्वेस्ट विंडोमध्ये देण्यात आलेल्या मुदतीच्या आत सरकारला SGB परत करण्यासाठी अर्ज केला नाही तर तुम्हाला थेट RBI च्या पुढच्या कॅलेंडरची वाट पाहावी लागेल. मुळात, RBI ने जाहीर केलेल्या कॅलेंडरमध्ये प्रिमॅच्युअर रिडेम्प्शनचा काळ ऑक्टोबर 2026 ते मार्च 2027 दिला आहे. या कालावधीत 32 जुन्या SGB Series रिडीम करता येणार आहे.
Global Bond Sell-off: जागतिक बाजारात टेन्शनचा माहौल; बाँड बाजारातील मृगजळ पाहून भलेभले चक्रावून गेले, भारतावरही होणार परिणामया 32 Series मध्ये 2019-20 च्या 10 Series, 2020-21 च्या 12 सीरिज तर 2021-22 च्या 10 सिरिजचा समावेश आहे. 2019 ते 20 या काळात SGB खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांना 15 ऑक्टोबर 2026 ते 17 मार्च 2027 या काळात एक्झिट घेण्याची संधी मिळेल. 2020 ते 21 काळात गोल्ड बाँड घेणाऱ्या गुंतवणूकदारांना 19 ऑक्टोबर 2026 ते 9 मार्च 2027 दरम्यान रक्कम मिळवता येईल. तर 2021 ते 22 सिरीजसाठी 2 नोव्हेंबर 2026 ते 8 मार्च 2027 चा कार्यकाळ देण्यात आला आहे. SGB Redeem केल्यावर चालू सोन्याच्या दराने रक्कम मिळेल. गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे रिक्वेस्ट विंडोत दिल्या गेलेल्या मुदतीच्या आत SGB Redeem साठी अर्ज करण्यात यावे.

