Gratuity Rules: प्रायव्हेट कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्यांना सॅलरी आणि पीएफनंतर ग्रॅच्युइटी सर्वात महत्त्वाची मानली जाते. तुम्ही एखाद्या कंपनीला तुमचा वेळ, किंवा अगदी तुमचं आयुष्यही देता तेव्हा कंपनी तुम्हाला कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून एकरकमी रक्कम देते, ज्याला ग्रॅच्युइटी म्हणतात. पण ग्रॅच्युइटी नेमकं कशी मोजली जाते? याबद्दल लोकांमध्ये अनेकदा संभ्रम असतो.
ग्रॅच्युइटी एकूण CTC, एकूण पगारावर म्हणजे ग्रॉस सॅलरी की फक्त मूळ पगारावर (basic salary) आधारित असते? तुम्हालाही याबद्दल संभ्रम असेल, तर चला सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत समजून घेऊया की नवीन कामगार संहिता 2026 अंतर्गत ग्रॅच्युइटी कशी ठरवली जाते आणि घरबसल्या ग्रॅच्युइटीचे कॅलक्युलेशन नेमकं कसं करता येतं?
सर्वप्रथम समजून घ्या की ग्रॅच्युइटीची गणना तुमच्या एकूण पगार किंवा तुमच्या CTC वर केली जात नाही. कर्मचाऱ्याचा मूळ पगार आणि महागाई भत्ता (डीए) ग्रॅच्युइटीच्या गणनेचा एकमेव खरा आधार असतो. म्हणजे तुमच्या सॅलरी स्लिपवर नमूद इतर भत्ते, जसे की HRA, बोनस, प्रवास किंवा वाहतूक भत्ता, ग्रॅच्युइटी कॅलक्युलेशनमध्ये जोडले जातात. म्हणजे तुमचा मूळ पगार आणि डीए जितका जास्त असेल, तितकी तुमची ग्रॅच्युइटीची रक्कम जास्त असेल.
ग्रॅच्युइटी केव्हा आणि कोणाला मिळते?
पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ॲक्ट, 1972 आणि नवीन कामगार नियमांनुसार एकाच संस्थेत पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे सलग नोकरी करणारी व्यक्ती ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरते. पण या दरम्यान, एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला किंवा अपघातामुळे कायमचे अपंगत्व आले, तर ही पाच वर्षांची अट लागू होत नाही.
याशिवाय ग्रॅच्युइटीसाठी वर्षे कॅलक्युलेट करताना सहा महिन्यांचा नियमही महत्त्वाचा असतो. त्यामुळे, तुम्ही एका वर्षात 6 महिन्यांपेक्षा जास्त काम केले, तर त्याला एक पूर्ण वर्ष मानले जाते. तसेच
7 वर्षे आणि 7 महिन्यांची सेवा = ही 8 वर्षे मानली जातात
7 वर्षे आणि 5 महिन्यांची सेवा = ही फक्त 7 वर्षे म्हणून मानली जातात
11 महिन्यांची नोकरी = एक पूर्ण वर्ष मानले जाते आणि आणि तुम्ही ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरता.
लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.
मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.
पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.
2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.
शैक्षणिक पात्रता
प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा