Headlines

Govinda : ‘ते कधीच प्रतिमेचा विचार करायचे नाहीत, संध्याकाळी दारू प्यायचे’, धर्मेंद्र आणि राजेश खन्नांबद्दल गोविंदाचं वक्तव्य


Govinda On Dharmendra And Rajesh Khanna : गोविंदानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राजेश खन्ना आणि धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

Govinda On Dharmendra And Rajesh Khanna
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – गोविंदा हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असून तो बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर होता. आता अभिनेता लवकरच ‘रूपा’ या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. अशातच आता अभिनेता त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये गोविंदानं त्याच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगितलं असून धर्मेंद्र आणि राजेश खन्ना यांच्याबद्दल भाष्य केलं आहे.

आयुष्य संपवण्याचा विचार मनात आलेला

गोविंदा म्हणाला की, ज्यावेळी त्याच्या आईचं निधन झालं तेव्हा तो खूप खचलेला. त्याची जगण्याची इच्छा नाहीशी झाली आणि अभिनेत्याच्या मनात जीव देण्याचा विचार आलेला. अभिनेत्याला वाटलं की, आता जगात काहीच उरलं नाही. मात्र, अचानक त्याला आपल्या मुलांचा विचार आला.

Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड

मुलाखतीदरम्यान गोविंदाला ‘तुझ्या आयुष्यात अनेक अभिनेत्री होत्या. कोणत्या अभिनेत्रीनं तुझं हृदय तोडलंय का?’ असं विचारण्यात आलं. यावर अभिनेता म्हणाला, ‘तसं कधीच घडलं नाही. माझ्या आईमुळे असं घडले होतं. जेव्हा आईचं निधन झालं, तेव्हा मला वाटलं की आता सर्व संपले. बस्स एवढंच. मी नर्मदा नदीच्या इथे गेलो आणि विचार केला की, थोड्या अंतरावर माझी आई सापडेल. मग अचानक मला वाटलं, मला माझ्या मुलांसाठी जगायचं आहे.’

Maharashtra TimesMaharashtrachi Hasyajatra Fame Viraj Jagtap : बालनाट्यापासून सुरुवात, अभिनयात करिअर करण्याचं स्वप्न उराशी पण आर्थिक तंगी, हास्यजत्रेनं पालटलं नशीब; डोळे पाणावणारा विराज जगतापचा संघर्ष

धर्मेंद्र आणि राजेश खन्ना यांच्याबद्दल गोविंदा काय म्हणाला?

अंडरवर्ल्डकडून तुला धमक्या मिळाल्या होत्या का? असं विचारलं असता गोविंदा म्हणाला की, ‘कोणाला नाही मिळाल्या? तो काळ तसाच होता. प्रत्येकाला धमक्या मिळत होत्या. याच मुलाखतीत गोविंदानं राजेश खन्ना आणि धर्मेंद्र यांच्याबद्दलही भाष्य केलं. राजेश खन्ना यांचे चित्रपट चालले नाहीत तेव्हा तो नाराज झाला होता का, असं गोविंदाला विचारण्यात आलं. यावर गोविंदा म्हणाला, ‘धर्मेंद्र आणि राजेश खन्ना कामाआधी नियोजन करण्यात खूप पटाईत होते, पण कामानंतरचं नियोजन…हे लोक प्रतिमा घडवण्यात, तुमची प्रतिमा कशी उंचावली जात आहे, याचा ते कधीच विचार करायचे नाहीत. ते लोक संध्याकाळी बसून दारू प्यायचे.’ ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये गोविंदा बोलत होता.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा