Mumbai Concert Drug Overdose Case: या घटनेनंतर ताडदेव पोलिसांनी सुमारे २०हून अधिक जणांचे जबाब नोंदवले. रुशील याच्यासोबत सहभागी झालेल्या त्याच्या मित्राच्या जबाबाचाही यामध्ये समावेश आहे.

वरळी डोममध्ये ६ जून रोजी ‘स्पेस बाउंड’च्या वतीने ‘क्लांगकुएन्स्टलर ऑल नाइट एल’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सुमारे सहा हजार प्रेक्षकांनी गर्दी केली होती. वकिलीचे शिक्षण घेतलेला रुशील गांगुर्डे ( वय २८) हा आपल्या मित्रांसह त्यात सहभागी झाला होता. रात्री साडेनऊच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला रुग्णवाहिकेतून ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले . तिथे दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
NCP नेते फडणवीसांना ‘वर्षा’वर भेटले, पण पार्थ-सुनेत्रा पवारांना कल्पनाही नव्हती; तटकरेंना ‘देवगिरी’वर बोलावणं, गैरसमजाचं कारण
‘ म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये सहा हजारांपेक्षा अधिक प्रेक्षकांनी गर्दी केली होती. वरळी डोमची क्षमता बऱ्यापैकी मोठी असली, तरी गर्दीच्या तुलनेत वातानुकूलित यंत्रणा, तसेच इतर आवश्यक असलेल्या उपाययोजना आयोजकांनी केल्या नव्हत्या, असे दिसून आल्याने आयोजकांविरुद्ध निष्काळजीने मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला.
कोंदट वातावरणामुळे रुशील याचा जीव गुदमरल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये दिसून आले होते. मात्र , त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. यामध्ये रुशीलच्या शरीरात ‘एमडीएमए’ हे ड्रग्ज आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे . या अहवालामुळे पोलिसांना या प्रकरणाच्या तपासाची दिशा बदलावी लागणार आहे , हे स्पष्ट झाले आहे.
Delimitation Bill: …तर आम्ही 24 तासांत भूमिका मांडू! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत खासदार सुप्रिया सुळेंचं सूचक विधान
ड्रग्जसाखळी शोधणार
रुशीलचा मृत्यू ड्रग्जमुळे झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्याचे चार-पाच मित्र , आयोजक, प्रत्यक्षदर्शी यांचे पुन्हा जबाब नोंदविण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही फूटेजचीही पडताळणी केली जाणार असून , ड्रग्जची साखळी शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

