Gondiya married boyfriend kills 33 year old girl friend in gondia after love affair started on instagram; महाराष्ट्रातील 33 वर्षीय तरुणी विवाहित प्रियकराकडे गेली, पण तिथं भयंकर घटना
Gondiya married boyfriend kills 33 year old girl friend in gondia after love affair started on instagram; महाराष्ट्रातील 33 वर्षीय तरुणी विवाहित प्रियकराकडे गेली, पण तिथं भयंकर घटना
Gondiya Murder Case: पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सिया या तरुणीचा कुजलेला मृतदेह आढळून आला. सियाच्या हातावर असलेल्या टॅट्यूमुळे तिची ओळख पटली आहे.
महाराष्ट्रातील 33 वर्षीय तरुणी विवाहित प्रियकराकडे गेली, पण तिथं भयंकर घटना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
गोंदिया: प्रेमप्रकरणातून होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या अलिकडच्या काळात वाढत असून दिवसागणित धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना मध्यप्रदेशातील भोपाळ इथं घडली असून महाराष्ट्रातील गोंदियातील 33 वर्षीय तरुणीचा खून करण्यात आला आहे. डेटिंग ॲपवरून सुरू झालेल्या या प्रेमप्रकरणाचा शेवट अत्यंत भयानक झाला असून विवाहित प्रियकराने प्रेयसीचा गळा दाबून खून केला. तसंच नंतर तिचा मृतदेह एका लोखंडी बॉक्समध्ये बंद करून सेप्टिक टँकमध्ये फेकून दिला. स्थानिक पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या प्रकरणाचा उलगडा केला आहे.
पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव सिया असं असून ती ३३ वर्षांची होती. तिचा पूर्वइतिहास वादग्रस्त असल्याचं दिसत आहे. कारण याआधी तिचे तीनदा लग्न झाले होते. ती महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये वास्तव्यास होती. त्यानंतर तिची ओळख भोपाळमध्ये राहणाऱ्या समीर नावाच्या व्यक्तीशी एका डेटिंग ॲपवर झाली आणि नंतर इंस्टाग्रामवर त्यांचे नियमित बोलणे होऊ लागले. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर समीरच्या प्रेमात सियाने आपले घरदार सोडले आणि ती भोपाळला आली. मात्र, भोपाळल्या गेल्यानंतर नवी माहिती उघड झाली. समीर हा विवाहित असल्याचं सियाच्या लक्षात आलं. तसंच त्याला दोन मुलेही आहेत. मात्र हे समजल्यानंतरही सिया ही समीरवर चौथ्यांदा लग्न करण्यासाठी दबाव टाकू लागली.
समीरने लग्न करण्यास नकार देताच सियाने त्याच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी केली. तसंच पैसे न दिल्यास कायदेशीर कारवाई करण्याची धमकीही दिली. लग्नासाठीचा दबाव आणि पैशासाठी होणाऱ्या ब्लॅकमेलिंगमुळे समीर आणि सिया यांच्यात मोठा वाद झाला. रागाच्या भरात समीरने सियाचा गळा दाबून खून केला. हा गुन्हा लपवण्यासाठी समीरने आपली आई, भाऊ आणि बहिणीचीही मदत घेतली. या सगळ्यांनी मिळून सियाचा मृतदेह एका लोखंडी पेटीत बंद केला आणि त्यानंतर हा मृतदेह जवळच्या एका रिकाम्या प्लॉटमधील सेप्टिक टँकमध्ये फेकून दिला. मात्र गुरुवारी, जवळ खेळणाऱ्या मुलांना टँकमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी समीरसह त्याला मदत करणाऱ्या कुटुंबीयांनाही ताब्यात घेतलं असून पुढील तपास केला जात आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा