मोदींच्या अपीलनंतर सोने-चांदीच्या मागणीत घट
सोन्याच्या वापराच्या मूल्यात 50% लक्षणीय वाढ होऊनही घट नोंदवली गेली. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार गेल्या वर्षी याच कालावधीत सोन्याची एकूण मागणी 139.7 टन होती, तर चालू वर्षात सोन्याची मागणी 650 ते 750 टन दरम्यान राहण्याचा WGC चा अंदाज आहे. विक्रीत झालेली घट, सीमा शुल्कातील वाढ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोन्याची खरेदी कमी करण्याचे केलेले आवाहन यामागील प्रमुख कारणे असल्याचे मानले जात आहेत.
KOSPI Crash: 4 कोटींचा नफा, साडे चार कोटी नुकसान! कुणी फ्लॅट गमावला तर कुणी आयुष्यभराची कमाई, कोरियन मार्केटमध्ये 40 टक्क्यांची घसरण
या दरम्यान शुक्रवार, आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी काही प्रमाणात नफावसुली केल्यामुळे शुक्रवारी सकाळी सोने आणि चांदीच्या दरात घट झाली. अमेरिकन डॉलरमधील वाढीमुळे नफावसूलीच्या पार्श्वभूमीवर सकाळी MCX वर सोने आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण दिसून आली.
इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी मे महिन्यात परकीय चलन वाचवण्यासाठी जनतेला अनावश्यक सोन्याची खरेदी कमी करण्याचे आवाहन केलेले. तसेच केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्कातही लक्षणीय वाढ केली होती, ज्याचा परिणाम आता दिसून येत असून जून तिमाहीत सोन्याची मागणी घटली आहे.
सोने-चांदीच्या किमतीत घसरणीचा कल कायम
सतत मजबूत होणारा अमेरिकी डॉलर आणि अमेरिका-इराण यांच्यातील वाढता तणाव या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, 31 जुलै रोजी सकाळी MCX वर सोने आणि चांदीचे भाव घसरले. पण तरीही अमेरिकेतील महागाईची आकडेवारी अपेक्षेपेक्षा कमी आल्यामुळे पुढील FOMC बैठकीत फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात आक्रमक करण्याची शक्यता काहीशा मावळली आहे.
सकाळी 9:10 वाजता MCX वर सोन्याचा ऑगस्ट वायदा 0.50 टक्के घसरून 1,42,547 रुपयांवर कमी झाला तर, सप्टेंबर चांदीचे फ्युचर्स 0.40% घसरणीसह 2,19,117 रुपये किलोवर कमी झाले आहेत. त्याचवेळी, आदल्या दिवसाच्या व्यवहार सत्रात अमेरिकेच्या फेड रिझर्व्हने व्याजदर स्थिर ठेवल्यानंतर MCX वर सोन्याच्या ऑगस्ट फ्युचर्स किमतीत 1% वाढ झाली, तर चांदीचे सप्टेंबर फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट 1% हून जास्त वाढ नोंदवली गेली.
पश्चिम आशियातील तणावाची परिस्थिती
इराणने जॉर्डनमधील अमेरिकन तळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन लष्कराने ‘इराणवर जोरदार हल्ले’ केल्याची घोषणा केल्यानंतर काही तासांतच गुरुवारी सकाळी जॉर्डनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने इराणमधून डागलेली पाच क्षेपणास्त्रे पाडली.
अशाप्रकारे, आता पश्चिम आशियातील संघर्ष आता क्षेत्रातील इतर देशांपर्यंत विस्तारत असून इजिप्त आणि सौदी अरेबिया देखील यात अधिकाधिक ओढले जात आहेत. तसेच मध्य-पूर्वेतील संघर्षामुळे तेलाचे दर चढेच राहिले असून किंचित नरमाईनंतर शुक्रवारी सकाळी ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल 88 डॉलर्सच्या आसपास सुरू होता.

