Headlines

Gold Demand India Fall Reasons; सराफा बाजारात उलटफेर, उच्चांकावर गेलेल्या सोन्याचा हव्यास मिटला; भारतीयांची दागिन्यांकडे पाठ, बदलता गोल्ड ट्रेंड समजून घ्या


Gold Demand: सोन्याची झळाळी फिकी की पडत आहे? गुंतवणुकीसाठी सोन्यावर अवलंबून असलेले लोक आता सोन्यापासून दूर होत आहेत. यामुळे सोन्याच्या मागणीत लक्षणीय घट झाली असून विक्रमी उच्चांकी किंमत, वाढीव आयात शुल्क आणि लग्नसराईसाठी कमी शुभ मुहूर्त असल्यामुळे चालू वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत भारतातील सोन्याची एकूण मागणी गेल्या 6 वर्षांतील नीचांकी पातळीवर घसरली.

सोन्यापासून भारतीयांचा मोहभंग

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या ताज्या अहवालानुसार अक्षय्य तृतीयेदरम्यान खरेदी झाली तरीही एकूण खप कमी झाले. मात्र, सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे या काळात देशात सोन्याच्या खरेदीवरील एकूण खर्च विक्रमी 1,97,900 कोटींवर पोहोचला. या दरम्यान, सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी शिखावरून 25 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

Maharashtra Times31 जुलैची डेडलाइन चुकली, आता इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करायला 5000 रुपयांचा दंड बसणार; कोणाला मोफत भरता येणार?
WGC च्या अहवालानुसार एप्रिल-जून या तिमाहीत सोन्याच्या मागणीत लक्षणीय घट झाली. YTD या कालावधीत सोन्याची एकूण मागणी 6% कमी होऊन 131 टनवर घसरली, तर मागील वर्षी याच कालावधीतील 88.8 टनांच्या तुलनेत दागिन्यांची मागणी 15% कमी होऊन 75.1 टन झाली.

सोन्याची मागणी कमी होण्याची कारणे

पाच प्रमुख कारणांमुळे सर्वसामान्य तसेच गुंतवणूकदार सोन्यापासून दूर होत आहेत.

Maharashtra TimesUPI पेमेंटच्या सवयीमुळे खरंच महिन्याचा बजेट बिघडतो का? दिल्लीतील महिलेने प्रयोग करून शेअर केला अनुभव
1. उच्च किमती: देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती जवळपास 60% जास्त आहेत, ज्यामुळे ग्राहकांची हलक्या वजनाच्या आणि कमी कॅरेटच्या दागिन्यांना पसंती दिसत आहे.

2. आयात शुल्क वाढ: पश्चिम आशियातील युद्धाचा ज्वर शिगेला पोहोचला असताना मे महिन्यात मोदी सरकारने सोन्याच्या आयातीवर शुल्क 15 टक्क्यांपर्यंत वाढवले, ज्यामुळे सोन्याच्या खरेदीत लक्षणीय घट झाली.

3. लग्नसराईचे कमी मुहूर्त: मे आणि जून या महिन्यांत लग्नासाठी कमी शुभ मुहूर्त असल्याने दागिन्यांच्या विक्रीवर परिणाम झाला.

4. पंतप्रधानांचे आवाहन: अनावश्यक सोन्याची खरेदी कमी करून बचतीचे इतर पर्याय अवलंबण्याच्या पंतप्रधान केलेल्या मोदींनी आवाहनाचाही बाजारावर परिणाम झाला.

5. परताव्याचा अभाव: सोन्यातील गुंतवणुकीतून आता लोकांना परतावा मिळत नाही. उच्चांकी झेप घेतल्यावर सोन्याच्या किंमतीत सतत चढ-उतार होत असून एकूण किमतीत घट झाली, ज्याचा गुंतवणूकदारांच्या खरेदीवर परिणाम झाला.

Maharashtra TimesIncome Tax: एक कोटी पॅकेज, तीन घरांच्या मालकाला जेव्हा 15000 रुपयांसाठी कर्ज काढावे लागले; CA ने सांगितले कारण

सोन्यातील गुंतवणूक वाढली

फिजिन्कल सोन्याची कमी झाली तरीही, या तिमाहीत गुंतवणुकीची मागणी उत्साहवर्धक राहिली. सोन्याच्या विटा आणि नाण्यांची मागणी 9% वाढून 50.3 टनवर पोहोचली. यापैकी ETF मध्ये 4.2 टन गुंतवणूक केली गेली, तर जागतिक पातळीवरील गोल्ड ईटीएफमधून पैसे काढण्याचे प्रमाण वाढले.

एप्रिल-जून तिमाहीत भारतातील एकूण सोन्याचा रिसायकलिंग गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 23.1 टनांच्या तुलनेत 17% कमी होऊन 192 टन झाला असून देशातील एकूण सोन्याची आयात गेल्या वर्षीच्या 127.4 टनांच्या तुलनेत 23% घटून 98.1 टन झाली.

सोन्याच्या किमतीत चढ-उतार

याशिवाय मागील सहा महिन्यांत सोन्याच्या किमतीतही लक्षणीय घट झाली. जानेवारी 2026 च्या अखेरीस MCX वरसोन्याचा भाव 1.93 लाखांवर उसळला होता, जो 1 ऑगस्ट रोजी सुमारे 1.42 लाख रुपयांवर कमी झाला आहे. अशाप्रकारे, सोन्याचा भाव उच्चांकावरून 26% हून अधिक घसरला आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत