Headlines

Goa Travel Restrictions | पावसाळ्यात गोवा ट्रिपचा प्लॅन करताय? आधी हा नवा नियम वाचा, नाहीतर थेट होईल जेल!


मुंबई – दीर्घप्रतीक्षेनंतर सगळ्यांचा लाडक्या पावसाला सुरुवात झाली आहे.. पाऊसाळा सुरु झाला तर खुप जण बाहेर जाण्याचे प्लॅनिंग करत असतात… धबधबे, नद्या, तलाव आणि इतर नैसर्गिक पाण्याच्या ठिकाणी या दिवसात फिरायला लोकांना खुप आवडते.. तुम पण प्लॅन केले असेल ना.. गोवा येथे पर्यटनासाठी जाण्याचा बेत आखत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे… गोवा राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय जारी केला आहे… जर तुम्ही धबधबे, नद्या, तलाव आणि इतर नैसर्गिक पाण्याच्या ठिकाणी गेला आहात आणि ण्याच्या प्रवाहात किंवा नदीपात्रात उतरण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर थेट कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचे कडक आदेश प्रशासनाने दिले आहेत.

काय आहे प्रकरण ?

गोवा राज्य सरकारने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी एक अत्यंत मोठा आणि कडक निर्णय घेतला आहे. सध्या गोव्यात मुसळधार पाऊस सुरू असून, धबधबे आणि नद्यांचा प्रवाह धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे बुडण्याच्या आणि अपघातांच्या घटना घडत असल्याने यंदा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

गोव्यातील प्रसिद्ध धबधबे आणि नद्यांच्या परिसरात पर्यटकांना फिरण्याची मुभा असेल, पर्यटकांना धबधब्यांच्या आणि निसर्गरम्य नद्यांच्या परिसरात जाण्यास किंवा तिथले सौंदर्य पाहण्यास कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. पर्यटक तिथे जाऊन सुरक्षित अंतरावरून निसर्गाचा आनंद घेऊ शकतात आणि फोटो काढू शकतात. मात्र, केवळ पाण्यात उतरण्यास कडक मनाई असेल.पोहणे ,आंघोळ करणे,पाण्यात उतरणे आणि सेल्फी काढणे सारख्या सर्व धोकादायक कृत्यांवर पुढील 60 दिवसांकरिता पूर्णपणे कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे.

या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संवेदनशील पर्यटनस्थळांवर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मात्र जर कोणीही पाण्याच्या प्रवाहात किंवा नदीपात्रात उतरण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर थेट कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचे कडक आदेश दक्षिण गोवा आणि उत्तर गोव्यातील जिल्हाधीकाऱ्यांनी दिला आहे

 

 



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत