बॉण्ड मार्केटचा अनेक दशकांतील उच्चांक
अमेरिका आणि इराण यांच्यातील शांततेच्या दिशेने कोणतीही डील होण्याची आशा मावळल्याने जगभर सरकारी रोख्यांची विक्री सुरू झाली. या दरम्यान, अमेरिकेच्या 30-वर्षीय बॉण्ड यील्ड 5.32% वर उसळला तर जर्मनी, फ्रान्स आणि जपान यांसारख्या देशांमधील यील्डदेखील दशकांतील उच्चांकीवर पोहोचले. अशा परिस्थितीत, जागतिक बॉण्ड मार्केटमधील या गोंधळाचा शेअर बाजार आणि तुमच्या खिशावर कसा परिणाम होऊ शकतो? पाहूया.
Early Retirement: चाळीशीत रिटायरमेंटचा FIRE फॉर्म्युला; पुण्यातील DINK कपलने तारुण्यातच एवढे कमवले की आता रिटायर होऊ शकतातअमेरिका आणि इराण यांच्यात 60 महिन्यांची शस्त्रसंधीची मुदत संपली असून अलीकडेच कोणताही नवीन करार होऊ शकला नाही आणि संघर्ष थांबवण्याची मुदतही संपल्यामुळे संघर्ष लांबवण्याची शक्यता, कच्च्या तेलाच्या उच्च किंमती आणि महागाई पुन्हा वाढण्याची भीती गुंतवणूकदारांना सतावू लागली.
अमेरिकी सरकारी रोख्यांवरील परतावा
अमेरिकेचा 30-वर्षीय ट्रेझरी यील्ड दोन बेसिस पॉइंट्सनी वाढून 5.3275%वर पोहोचले, जे 2002 नंतरचे सर्वोच्च आहे, तर 20-वर्षीय ट्रेझरी यील्डनेही 2006 नंतरचा विक्रमी उच्चांक गाठला असून जागतिक वित्तीय बाजारांसाठी महत्त्वपूर्ण मानले जाणारे 10-वर्षीय अमेरिकन ट्रेझरी यील्ड 4.74% वर पोहोचले आहेत.
अमेरिकेतच नव्हे, तर जागतिक स्तरावर दबाव
तसेच बॉण्ड मार्केटमधील संकट केवळ अमेरिकेपुरते मर्यादित नाही. जर्मनीच्या 10-वर्षीय बॉन्ड यील्डने 15 वर्षांतील सर्वोच्च पातळी गाठली असून फ्रान्स यील्ड 2008 नंतरची सर्वोच्च उच्चांकावर उसळले आहेत. जपानच्या 10-वर्षीय सरकारी बॉन्ड यील्डने, जवळपास चार दशकांतील सर्वाधिक, 2.954% वाढ नोंदवली असताना ब्रिटन, इटली, स्वित्झर्लंड आणि कॅनडा येथील सरकारी यील्डमध्येही मोठी वाढ दिसून आली.
महागड्या तेलाचा बॉण्ड मार्केटवरील परिणाम
कच्च्या तेलाची किंमत वाढते तेव्हा पेट्रोल-डिझेल, हवाई प्रवास, मालवाहतूक, प्लॅस्टिक, रंग, रसायने आणि इतर अनेक दैनंदिन वस्तूंच्या किंमती वाढतात जो कंपन्या ग्राहकांकडून वसूल करतात, ज्यामुळे महागाई वाढते. अशा स्थितीत, महागाई वाढल्यास मध्यवर्ती बँका व्याजदर कमी करणे टाळतात आणि उलट, परिस्थिती आणखी बिघडली, तर व्याजदर वाढवणे भाग पडू शकते. हीच भीती सध्या बॉण्ड बाजारातील गुंतवणूकदारांना सतावत आहे.
गुंतवणूकदारांनो, लक्ष द्या! सोनं की चांदी, Robert Kiyosaki यांच्या मते ऑगस्टचा बेस्ट पर्याय कोणता?
भारतीय शेअर मार्केटसाठी धोक्याची घंटा?
अमेरिकी बाँड यील्ड्समधील वाढीमुळे भारतीय शेअर बाजारासमोर 5 प्रमुख आव्हाने उभी राहू शकतात. यापैकी पहिले
संबंधित आहे. यूएस सरकारी बाँड्स शेअर बाजारातील जोखमीशिवाय 5% पेक्षा जास्त परतावा देऊ लागल्यास परदेशी गुंतवणूकदार भारतासारख्या उदयोन्मुख बाजारांमधून निधी काढून अमेरिकेत हलवतात, त्यामळे शेअर्समध्ये विक्रीची लाट येऊ शकते आणि रुपयावर दबाव वाढू शकतो.
त्यानंतर, दुसरी चिंता
असेल. भारत गरजेच्या मोठ्या प्रमाणात क्रूडची परदेशातून आयात करतो, त्यामुळे कच्च्या तेलाची किंमत 90 डॉलरवर राहिल्यास आयात बिल वाढू शकते. परिणामी, रुपया कमजोर झाल्यास खर्च आणखी वाढू शकतो.
यामुळे
वाढू शकतो. इंधन आणि वाहतुकीच्या खर्चामुळे भाजीपाला, धान्य, दूध आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आरबीआयला व्याजदर कमी करणे कठीण होईल.
चौथी चिंता
असेल. आयटी, तंत्रज्ञान, इंटरनेट आणि इतर ग्रोथ स्टॉक्समधील चढ-उतार भविष्यातील कमाईवर अवलंबून असतात. वाढत्या बाँड यील्ड्समुळे त्या भविष्यातील कमाईचे वर्तमान मूल्य कमी होते त्यामुळे, P/E गुणोत्तर शेअर्स सर्वात आधी दबावाखाली येतात.
पाचवा
होईल. जागतिक व्याजदर उच्च राहिल्यास कंपन्यांना नवीन कर्ज घेणे अधिक महाग होऊ शकते. परिणामी विमान वाहतूक, पेंट, टायर, रसायन, लॉजिस्टिक्स आणि तेल-केंद्रित कंपन्यांच्या मार्जिनवरही दबाव येऊ शकतो.

