Ghatkopar Landslide due to Mumbai Rain Ashok Nagar Residence dies after trapped under debris; घाटकोपरमध्ये दोन-तीन घरांवर दरड कोसळली, दोघांचा मृत्यू, काही जण ढिगाऱ्याखाली अडकले, पावसामुळे पहाटे चार वाजता दुर्घटना
Ghatkopar Landslide due to Mumbai Rain Ashok Nagar Residence dies after trapped under debris; घाटकोपरमध्ये दोन-तीन घरांवर दरड कोसळली, दोघांचा मृत्यू, काही जण ढिगाऱ्याखाली अडकले, पावसामुळे पहाटे चार वाजता दुर्घटना
मुंबई : मुंबईतील घाटकोपर भागात दरड कोसळल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. अशोक नगरमधील ‘गौसिया चाळी’तील दोन ते तीन घरांवर दरडीचा ढिगारा कोसळला आहे. प्राथमिक माहितीनुसार दोघांचा मृत्यू झाला असून त्यांचे शव बाहेर काढण्यात आले आहेत, तर ढिगाऱ्याखाली तीन ते चार जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मंगळवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे दरड कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
१२ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजून ४८ मिनिटांच्या सुमारास मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळाली. मुंबई पूर्व उपनगरातील घाटकोपर येथील अशोक नगर परिसरातील ‘राठोड मेडिकल’जवळ ही दरड कोसळली आणि तिचा ढिगारा गौसिया चाळीवर पडला.
घटनेची माहिती मिळताच बीएमसीचे अग्निशमन दल, पोलीस, वॉर्डातील कर्मचारी, संबंधित वीज वितरण कंपनी आणि १०८ रुग्णवाहिका सेवा यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अडकलेल्या रहिवाशांचा शोध घेण्यासाठी आपत्कालीन पथकांकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.
दोघांच्या बॉडी बाहेर काढल्या
पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार “पावसामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोकनगर भागात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. आतापर्यंत दोन बॉडी बाहेर काढण्यात आल्या असून बचावकार्य सुरु आहे.”
येथे पोलीस कर्मचारी तसेच बचावकार्यासाठी आवश्यक असलेली सर्व पथके- मुंबई महापालिका, एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांचे अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. ही घटना पहाटे पावणे चार वाजताच्या सुमारास घडली. यात ४ ते ५ जण अडकल्याची शक्यता आहे.”
भाजपचे स्थानिक आमदार राम कदम यांनी एबीपी माझा वृत्तावाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड ते चांदिवली या परिसरात डोंगराळ भाग असून त्यापैकी सर्वाधिक भाग त्यांच्या मतदारसंघात येतो. राम कदम म्हणाले, “डोंगराळ भागात संरक्षक भिंतीची गरज आहे. आमदार-खासदारांना मिळणाऱ्या निधीची मर्यादा आहे. संरक्षक भिंती बांधल्यानंतरही धोकादायक स्थितीत असलेल्या घरांतील नागरिकांना शासन स्तरावर स्थलांतर करण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. संरक्षक भिंतीच्या निधीतही वाढ करावी लागेल.”
“भिंती बांधल्यानंतर काही जण त्यावर झोपड्या बांधतात. त्या झोपड्या गोरगरीबांना विकून त्यांची फसवणूक करतात. कालांतराने त्याही झोपड्या अधिकृत होतात आणि त्यावर संरक्षक भिंती बांधल्या जातात. कारण भिंती बांधताना महापालिका, कलेक्टर आणि म्हाडा यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे अनधिकृत झोपड्या थांबत नाहीत. परिणामी संरक्षक भिंती एकावर एक बांधल्या जातात आणि अशा दुर्दैवी घटना वाढत जातात. त्यामुळे धोकादायक भागातील लोकांना लवकरात लवकर स्थलांतरित करावं लागेल” असं मत राम कदम यांनी व्यक्त केलं.
महामुंबई परिसरात पावसाचा जोर
दरम्यान, महामुंबई परिसरात गुरुवारपासून पावसाचा जोर थोडा वाढू शकेल, असा अंदाज वर्तवला जात असतानाच मुंबईत सोमवारी रात्रीपासूनच पाऊस वाढायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं. महामुंबई परिसरात मंगळवारी दिवसभर पावसाची उपस्थिती होती. त्यामुळे काही रस्त्यांवर पाणी साचलेले होते, याचा परिणाम मुंबईच्या रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही झाला.
मुंबईत कुलाबा येथे मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये १४ मिलीमीटर, तर सांताक्रूझ येथे २०.८ मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे सांताक्रूझ येथे २००० मिमी पावसाचा टप्पा ओलांडला, तर कुलाबा येथे १६७५.८ मिमी पावसाची आत्तापर्यंत नोंद झाली आहे. रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी दिवसभरात फारशी उसंत घेतली नाही. सांताक्रूझ येथे स. ८.३० ते सायं. ५.३०पर्यंत ४३.८ मिमी, तर कुलाबा येथे २४.४ मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे तापमानात घट झाली. सांताक्रूझ येथे २७.१ तर, कुलाबा येथे २७.६ अंश से. कमाल तापमान होते.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा