Headlines

Gen Z and Gold Investment; गोल्ड मार्केटमध्ये नवा ट्विस्ट, ‘जेन झीं’चा 315 लाख कोटींच्या सोन्यावर डोळा; अनेक पिढ्यांची परंपरा मोडीत काढणार


Gold India News: भारतीयांमधील सोने खरेदीची पुढील लाट पारंपरिक सराफा दुकानांमधून नव्हे, तर मोबाईल फोनमधून सुरू होऊ शकते. भारतीयांमध्ये सोने दीर्घकाळापासून परंपरा आणि सुरक्षिततेचे प्रतीक राहिले आहे, पण नवीन पिढी किंवा Gen Z साठी सोने केवळ कौटुंबिक वारसा किंवा लग्नसराई यापलीकडे अधिक महत्त्वाचे ठरताना दिसत आहे.

होय, तरुण भारतीय आता सोन्याकडे संपत्ती निर्मिती, लिक्विडीटी आणि भावनिक मूल्य यांचा संगम असलेली एक आधुनिक आर्थिक मालमत्ता म्हणून पाहत आहेत.

Maharashtra TimesElon Musk यांना मोठा आर्थिक फटका! SPACEX च्या शेअर्सची घसरण पडली महागात, काहीच तासात लाखो कोटींचा लॉस

गोल्ड मार्केटमध्ये आता Gen Z पॉवर

सध्या Gen Z म्हणून ओळखली जाणारी आपल्या देशातील तरुण पिढी दररोज इतिहास घडवण्यासाठी सज्ज आहे. राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथील दृश्य संपूर्ण जगाने पाहिलेच, तर शेअर बाजारात या पिढीचा वाटा जवळपास 40% इतका वाढला आहे. म्हणजे शेअर बाजाराचे ओझे आता Gen Z च्या खांद्यावर असल्याचं दिसत असून आता सोने बाजाराची पाळी आहे.

भारतात पारंपारिकपणे सोने खरेदी लग्नसराई, सण-उत्सव किंवा वडीलधाऱ्यांच्या बचतीशी जोडले जाते. पण देशाची नवीन पिढी, Gen Z, ही धारणा पूर्णपणे बदलताना दिसत आहे. तरुणांची डिजिटल-फर्स्ट वृत्ती आणि त्यांची बदलती जीवनशैली, भारताच्या 315 लाख कोटींच्या विशाल सुवर्ण बाजारात उपभोग आणि गुंतवणुकीमध्ये एक नवीन क्रांती घडवून आणण्यास सज्ज असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

Maharashtra TimesLPG Price Hike : सरकारचा एक होकार अन् सामान्यांच्या खिशावरील भार वाढणार; LPG सिलेंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता

सोने बाजारात ‘जेन झीं’ची नवीन क्रांती

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या ‘गोल्डन फ्लाईट 2047’ या नवीन अहवालानुसार, आजच्या Gen Z पिढीकडे घरात असलेल्या अंदाजे 31000 टन सोन्याचे आधुनिक काळातील मौल्यवान वस्तूमध्ये रूपांतर करण्याची एक महत्त्वपूर्ण संधी आहे, ज्याची किंमत 315 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

अहवालानुसार,1997 ते 2012 दरम्यान जन्मलेले – GenZ – सोन्याकडे केवळ वारसा हक्काचा दागिना म्हणून नाही, तर लवचिक आर्थिक मालमत्ता म्हणून पाहत आहेत. यामुळे त्यांची डिजिटल गोल्ड आणि इतर तंत्रज्ञान-आधारित गुंतवणूक उत्पादनांमध्ये रुची वाढत असून नवीन पिढी 2035 पर्यंत ग्राहक खर्चात अंदाजे 2 ट्रिलियन डॉलर्सचे योगदान देईल अशी अपेक्षा आहे. याशिवाय GenZ पारंपरिक मालकीच्या विचारांच्या पलीकडे जाऊन देशाच्या सोन्याच्या बाजारपेठेत वेगाने परिवर्तन घडवत असल्याचेही अहवालात पुढे म्हटले आहे.

Maharashtra TimesInheritance Rights: नॉमिनी प्रॉपर्टीचा मालक नाही! काय आहे कायदेशीर नियम? वाद न घालता मृत्युपत्राद्वारे मिळेल मालमत्तेचा वारसा! कसं पाहाअशाप्रकारे, मागील अनेक पिढ्यांच्या तुलनेत तरुण ग्राहक सोय, तरलता, वैयक्तिकरण आणि जबाबदार स्रोतांवर अधिक भर देत असून खरेदी प्रक्रियेमध्ये ऑनलाइन रिसर्च आणि ऑफलाइन खरेदी यांचा अधिकाधिक समावेश होत आहे, तर गुंतवणुकीचे पर्याय प्रत्यक्ष दागिन्यांपुरते मर्यादित न राहता डिजिटल सोने आणि इतर आर्थिक उत्पादनांपर्यंत विस्तारत आहेत.

सोप्या भाषेत बोलायचे तर आताच्या नव्या पिढीसाठी सोने खरेदीची प्रक्रिया गरज पडल्यास कॅशमध्ये रूपांतर करण्याची सोय, वैयक्तिकृत खरेदी आणि जबाबदारीने केलेली सोन्याची खरेदी यांसारखे घटक महत्त्वाचे आहेत. तरुण मुलं-मुली ऑनलाइन माहिती गोळा करतात आणि मग गरजेनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करतात.

सोनं बनेल आर्थिक ताकद

  • भारतीय जनतेच्या घरांमधील जमा 31,000 टनांहून अधिक सोने देशाची मोठी आर्थिक ताकद आहे.
  • जनतेच्या लॉकरमध्ये जमा सोन्याचा थोडासाही भाग औपचारिक वित्तीय प्रणालीमध्ये आणला गेला, तरी त्यामुळे देशाच्या वित्तीय बाजाराला तीन मोठे फायदे मिळू शकतात.
  • पहिले म्हणजे, यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध होऊ शकेल.
  • दुसरे म्हणजे, गुंतवणुकीसाठी अधिक भांडवल उभारले जाऊ शकते.
  • तिसरे म्हणजे, परदेशातून सोने आयात करण्याची गरजही काही प्रमाणात कमी होऊ शकते.

त्याचवेळी, भारताला सुवर्ण मुद्रीकरण योजना, गोल्ड रिसायकलिंग, इलेक्ट्रॉनिक गोल्ड पावत्या, डिजिटल सोने, बुलियन बँकिंग आणि सुवर्ण-समर्थित वित्तीय उत्पादने एकत्रित करण्याची जागतिक सुवर्ण परिषदेने शिफारस केली. यामुळे सोने केवळ घरातील तिजोरींमध्ये पडून राहण्याऐवजी गरजेनुसार गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहारांसाठी वापरता येईल.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत