Pahalgam Terror Attack : पुढचे स्थळ चंदनवेलीला जाऊन त्यांना परत श्रीनगरला मुक्कामी जायचे होते. पण चंदनवेलीला पोहोचत नाही तोच दहशतवादी हल्ल्याची माहिती त्यांना मिळाली आणि लगेच माघारी फिरण्याची सूचना करण्यात आली
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महेश गुंडेटीवार, गडचिरोली : भारतासह जगभराला हादरवून सोडणाऱ्या जम्मू-काश्मिरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातून गडचिरोलीचे पर्यटक अगदी थोडक्यात बचावले. हा हल्ला होण्याच्या जेमतेम तासाभरापूर्वी त्यांनी घटनास्थळ सोडले होते. आणखी एक तास त्याच ठिकाणी असतो, तर काय झाले असते? हा नुसता विचार करूनही त्या पर्यटकांसह त्यांच्या कुटुंबियांच्या काळजात धस्स झाले. पण नशिब बलवत्तर म्हणून सर्वजण सुखरूप बचावले.
या पर्यटकांमध्ये गडचिरोलीतील काही सेवानिवृत्त नायब तहसीलदारांच्या कुटुंबियांसह एकूण 43 जण आहेत. हे सर्व जण सोबतच उत्तर भारतात पर्यटनाला गेले आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांना भीतीने ग्रासले असले, तरी सर्व जण सुखरुप आहेत.
11 एप्रिल रोजी गडचिरोलीतील ज्येष्ठ नागरिकांसह काही पर्यटकांचा जत्था एका ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून रेल्वेने उत्तर भारताच्या पर्यटनाला निघाला. मथुरा, आग्रा, कटरा, वैष्णोदेवी असे करत हे पर्यटक श्रीनगरला पोहोचले. तेथून सोनमर्ग, गुलमर्गमधील निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर घटनेच्या दिवशी, म्हणजे मंगळवारी 22 एप्रिलला ते पहलगामला पोहोचले. ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन घाटीत ते घोड्यावर बसून पोहोचले. तेथे डोळ्याचे पारणे फेडणारे नैसर्गिक सौंदर्य पाहून आणि विरंगुळा झाल्यानंतर हा जत्था पुन्हा घोड्यावरुन खाली पहलगामला आला. Pahalgam Attack : खारट फ्राईड राईसने आयुष्य बदललं, पहलगामला निघालेल्या 11 जणांच्या कुटुंबाचा जीव वाचवला पुढचे स्थळ चंदनवेलीला जाऊन त्यांना परत श्रीनगरला मुक्कामी जायचे होते. पण चंदनवेलीला पोहोचत नाही तोच दहशतवादी हल्ल्याची माहिती त्यांना मिळाली आणि लगेच माघारी फिरण्याची सूचना करण्यात आली. ज्या ठिकाणावरुन आपणकाही वेळापूर्वी परतलो, त्याच ठिकाणी अशी काही घटना घडली यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. ‘हा हल्ला झाला त्यावेळी आपण तिथे असतो तर’ या मनात डोकावलेल्या कल्पनेनेही डोकं सुन्न झालेल्या अवस्थेत ते सर्व जण श्रीनगरच्या दिशेने रवाना झाले. Kaustubh Ganbote : दहशतवाद्याने विचारलं अजान पढते हो? आम्ही बायकांनी टिकल्या काढल्या, अल्लाह हू अकबर ओरडलो; गणबोटेंच्या पत्नीने सांगितला काटा आणणारा अनुभव
पहलगाम हल्ल्यात पुण्यातील उद्योजकाचा मृत्यू, कौस्तुभ गणबोटेंवर वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
काश्मिरी लोक म्हणाले, ‘घाबरू नका, आमच्या घरी राहा’
घाबरलेल्या गडचिरोलीकर पर्यटकांना त्यांच्या गाडीचा चालक असलेल्या काश्मिरी मुस्लिम नागरिकाने धीर दिला. आमची रोजीरोटी तुमच्या भरवशावर आहे. तुम्ही घाबरू नका. आम्ही तुम्हाला मदत करतो. गरज पडल्यास आमच्या घरी सुरक्षित राहा, अशा शब्दात काश्मिरी मुस्लिम नागरिकांनी पर्यटकांना हिंमत दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र काश्मिरमधील टूर आटोपती घेत गडचिरोलीकर पर्यटकांचा जत्था बुधवारी सकाळी जम्मूच्या दिशेने रवाना झाला. तेथून अमृतसर, दिल्लीमार्गे हे पर्यटक नियोजित दौरा पूर्ण करून गडचिरोलीला परत येणार आहेत.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा