white cobra horse 65 inch winner price over luxury cars sarangkheda fair; 65 इंच उंची, 15 स्पर्धांचा विजेता आणि महागड्या गाड्यांपेक्षा जास्त किंमत ! महाराष्ट्रात दाखल झालेल्या घोड्याची चर्चा…
white cobra horse 65 inch winner price over luxury cars sarangkheda fair; 65 इंच उंची, 15 स्पर्धांचा विजेता आणि महागड्या गाड्यांपेक्षा जास्त किंमत ! महाराष्ट्रात दाखल झालेल्या घोड्याची चर्चा…
सारंगखेडा येथे सुरू असलेल्या अश्व पंढरीत पंजाबचा व्हाईट कोब्रा घोडा दाखल झाला आहे. या घोड्याची किंमत तब्बल एक कोटी ७१ लाख रुपये आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महेश पाटील, नंदुरबार: अश्व पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा येथील यात्रेत आतापर्यंत 3 हजार घोडे दाखल झाले आहेत. या अश्व बाजारात पंजाब राज्यातील व्हाईट कोब्रा दाखल झाला आहे. या घोड्याने आतापर्यंत देशातील विविध भागात झालेल्या तब्बल 15 ‘हॉर्स शो’ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याची किंमत तब्बल 1 कोटी 71 लाख रुपये आहे. त्याला पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. सध्या सारंगखेडा यात्रेत व्हाईट कोब्राचा दबदबा पाहायला मिळत आहे.
भारतात दोन नंबरचा अश्व बाजार असलेला सारंगखेडा यात्रेत रोज नव नवीन घोडे दाखल होत आहेत. सारंगखेडाच्या बाजारात दरवर्षी होणाऱ्या चेतक फेस्टिवलमध्ये हजारो घोड्यांची खरेदी आणि विक्री होत असते. तसेच देशभरातील बाजार आणि स्पर्धा गाजवणारे तसेच नामवंत घोडे या ठिकाणी दाखल होत असतात. या अश्वांची किंमत महागड्या गाड्यांपेक्षाही अधिक लावली जाते. येथे दाखल झालेल्या अश्वांची किंमत त्यांची उंची, राहणीमान, त्यांची ठेवण, खानपान, तो कुठल्या प्रकारचा जातीवंत आहे, यावरुन त्याची किंमत ठरवली जाते. हे महागडे घोडे ‘हॉर्स शो’ साठी तयार केले जातात.
जातिवंत घोड्यांनी किती स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे आणि किती स्पर्धा जिंकल्या आहेत, यावर देखील त्याची किंमत लावली जाते. असाच पंजाब राज्यातील भटिंडा येथील जगतार सिंग यांच्या मालकीचा व्हाईट कोब्रा दाखल झाला आहे. या अश्वाने चेतक फेस्टिव्हलमध्ये लक्ष वेधलं आहे. या घोड्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची उंची 65 इंच असून वय साडे सात वर्ष इतके आहे. त्याच्या खानपाण्यासाठी महिन्याला 75 हजार रुपये पेक्षा अधिक खर्च केला जातो.
त्याला दररोज 10 लिटर गायीचे दूध, चना, 150 ग्रॅम देसी घी, जव यासारखे विशिष्ट प्रकारचे खाद्य त्याला दिले जाते. व्हाईट कोब्राची देखरेख करण्यासाठी दोघांची नियुक्ती केली आहे. ‘नुकरा’ प्रजातीच्या या घोड्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यापासून होणाऱ्या अश्व अपत्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यांची किंमत देखील दर्जेदार असल्याचं घोडे मालक जगतार सिंग यांनी सांगितलं.
या घोड्याची किंमत तब्बल एक कोटी 71 लाख रुपये लावण्यात आली आहे. या व्हाईट कोब्राने चेतक फेस्टिवलमधे लक्ष वेधले असून त्याला पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. विशेष म्हणजे व्हाईट कोब्रा या घोड्याने देशभरातील विविध ‘हॉर्स शो’ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा