Headlines

Gadchiroli Ashram School: गडचिरोलीतील आश्रमशाळेची मान्यता रद्द; मुख्यमंत्र्यांचे आदेश, सर्पदंश घटनेचे मंत्रिमंडळात पडसाद


मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या गंभीर घटनेचे पडसाद मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित आश्रमशाळेची शासकीय मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश दिला.

जागतिक आदिवासी दिन साजरा होत असताना, ९ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात मध्यरात्री सहा विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केला. या घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून, अन्य तिघींवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आश्रमशाळा वसतिगृहांतील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Maharashtra TimesAir India Turbulence : गांजा ओढून पायलट ‘हवेत’? एअर इंडिया विमान प्रकरणात प्राथमिक संशय, अमली पदार्थ सेवन चाचणी पॉझिटिव्हउईके यांनी केला मुद्दा उपस्थित

या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत विद्यार्थिनींच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. ही घटना ज्या आश्रमशाळेच्या वसतिगृहात घडली, ती संस्था तीन वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिलेले काँग्रेसचे मारोतराव कोवासे यांची असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘ते अशा पद्धतीने आश्रमशाळा चालवत असतील आणि लहान मुलींच्या सुरक्षेशी खेळत असतील, तर ते कसे माफ करणार,’ असा सवाल उईके यांनी बैठकीत उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांकडून नाराजी

त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘ही आश्रमशाळा सरकारी अनुदान घेत असतानाही शिक्षक, वॉर्डन; तसेच इतर आवश्यक सुविधा पुरवत नसल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे या आश्रमशाळेची तपासणी करून अहवाल दिलेल्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावे, तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी,’ असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Maharashtra TimesGhatkopar Landslide : घाटकोपरमध्ये दोन-तीन घरांवर दरड कोसळली, दोघांचा मृत्यू, काही जण ढिगाऱ्याखाली अडकले, पावसामुळे पहाटे चार वाजता दुर्घटनासर्व आदिवासी आश्रमशाळांची तपासणी

मुख्यमंत्र्यांनी सर्व शासकीय आदिवासी आश्रमशाळांची तपासणी करण्याचे आदेशही दिले. ‘तपासणी करताना केवळ रस्त्यालगतच्या आश्रमशाळांची पाहणी करू नका; दुर्गम भागातील आश्रमशाळांचीही तपासणी करा. त्यासाठी मुख्य सचिवांनी बैठक घेऊन सर्वंकष तपासणीची यंत्रणा उभी करावी. सर्व संबंधित विभागांना त्यात समाविष्ट करावे,’ अशा सूचना फडणवीस यांनी केल्या.

नाशिक, पालघरच्या भूकंपावर चर्चा
मंत्रिमंडळ बैठकीत नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील भूकंपाच्या घटनांवरही चर्चा झाली. या घटनांचा सेंटर फॉर सेस्मिक टेक्नॉलॉजी या संस्थेकडून अभ्यास सुरू आहे. याशिवाय आणखी सक्षम संस्थांची मदत घेऊन सर्वंकष मूल्यमापन करावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. भूकंपाबाबत नागरिकांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत