जागतिक आदिवासी दिन साजरा होत असताना, ९ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात मध्यरात्री सहा विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केला. या घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून, अन्य तिघींवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आश्रमशाळा वसतिगृहांतील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
Air India Turbulence : गांजा ओढून पायलट ‘हवेत’? एअर इंडिया विमान प्रकरणात प्राथमिक संशय, अमली पदार्थ सेवन चाचणी पॉझिटिव्हउईके यांनी केला मुद्दा उपस्थित
या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत विद्यार्थिनींच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. ही घटना ज्या आश्रमशाळेच्या वसतिगृहात घडली, ती संस्था तीन वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिलेले काँग्रेसचे मारोतराव कोवासे यांची असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘ते अशा पद्धतीने आश्रमशाळा चालवत असतील आणि लहान मुलींच्या सुरक्षेशी खेळत असतील, तर ते कसे माफ करणार,’ असा सवाल उईके यांनी बैठकीत उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांकडून नाराजी
त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘ही आश्रमशाळा सरकारी अनुदान घेत असतानाही शिक्षक, वॉर्डन; तसेच इतर आवश्यक सुविधा पुरवत नसल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे या आश्रमशाळेची तपासणी करून अहवाल दिलेल्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावे, तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी,’ असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
Ghatkopar Landslide : घाटकोपरमध्ये दोन-तीन घरांवर दरड कोसळली, दोघांचा मृत्यू, काही जण ढिगाऱ्याखाली अडकले, पावसामुळे पहाटे चार वाजता दुर्घटनासर्व आदिवासी आश्रमशाळांची तपासणी
मुख्यमंत्र्यांनी सर्व शासकीय आदिवासी आश्रमशाळांची तपासणी करण्याचे आदेशही दिले. ‘तपासणी करताना केवळ रस्त्यालगतच्या आश्रमशाळांची पाहणी करू नका; दुर्गम भागातील आश्रमशाळांचीही तपासणी करा. त्यासाठी मुख्य सचिवांनी बैठक घेऊन सर्वंकष तपासणीची यंत्रणा उभी करावी. सर्व संबंधित विभागांना त्यात समाविष्ट करावे,’ अशा सूचना फडणवीस यांनी केल्या.
नाशिक, पालघरच्या भूकंपावर चर्चा
मंत्रिमंडळ बैठकीत नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील भूकंपाच्या घटनांवरही चर्चा झाली. या घटनांचा सेंटर फॉर सेस्मिक टेक्नॉलॉजी या संस्थेकडून अभ्यास सुरू आहे. याशिवाय आणखी सक्षम संस्थांची मदत घेऊन सर्वंकष मूल्यमापन करावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. भूकंपाबाबत नागरिकांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या

