फ्रांसमध्ये G7 Summit झाली. त्यावेळी द्विपक्षीय भेटीदरम्यान भारताने स्पष्ट केलं होतं की पत्रकार परिषदेत कोणताही प्रश्न विचारण्यात येणार नाही. मात्र असे न होता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे बोलणं संपल्यानंतर पत्रकारांना काही प्रश्न आहेत का असे म्हटले असा दावा भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी केला. यावर भारत सरकारने देखील स्पष्टीकरण दिले आहेत.

भारतातील अमिरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी आरोप केले आहेत की भारताने विशेष विनंती करत म्हटलं होतं की कोणताही प्रश्न मीडिया विचारणार नाही. ही विशेष विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची द्विपक्षीय भेटीदरम्यान भारताने केली होती. या आरोपानंतर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे.
नेमके काय आरोप सर्जिओ गोर यांनी केले आहेत?
G7 Summit दरम्यान पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची द्विपक्षीय भेट झाली. तेव्हा दोन्ही बाजूने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यापूर्वी पत्रकार परिषदेत कोणतेही प्रश्न प्रसारमाध्यमे विचारणार नाही असे भारत सरकारने स्पष्ट केले होते, असे सर्जिओ गोर यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले की “मी पंतप्रधान यांना सांगितले की भारतीयांची अशी इच्छा आहे की कोणतेच प्रश्न विचारले जाऊ नयेत. त्यांनी नक्कीच असेच होणार असे म्हटले.
पत्रकार बैठकीसाठी सभागृहात दाखल झाले. जवळपास ५० कॅमेरा तिथे लावण्यात आले. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी तर दुसऱ्या बाजूला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बसलेले होते. दोघांनीही पत्रकारांशी बोलायला सुरुवात केली. त्यांचे बोलणे संपले तेव्हा राष्ट्राध्यक्षांनी सर्वात पहिली गोष्ट केली ती म्हणजे कॅमेऱ्याकडे पाहिलं आणि म्हंटल ‘काही प्रश्न आहेत का?’ असा दावा सर्जिओ गोर यांनी केला. त्यांनी सांगितले या एका व्याख्यामुळे पत्रकारांना प्रश्न विचारायला वाव मिळाला. त्यानंतर पत्रकार परिषद ४५ मिनिटे झाली. त्यात सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
G7 summit मध्ये नेमकी काय चर्चा झाली?
द्विपक्षीय भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी Strait of Hormuz मध्ये जहाजांवरील हल्ले वाढत असल्याने सागरी वाहतूक करणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष सुरु असल्याने Strait of Hormuz मध्ये तणाव वाढला आहे. लाखो भारतीय हे सागरी वाहतूक क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांची सुरक्षा महत्वाची आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सांगितले.
ट्रम्प यांनी दिले उत्तर
मोदींनी केलेल्या वक्तव्यानंतर ट्रम्प यांनी यावर उत्तर दिले की, भारतीयांवर जर कोणी हल्ला केला तर अमेरिका त्यांच्या मदतीसाठी सज्ज असेल आणि भारतीयांच्या बाजूने असेल. त्यादरम्यान त्यांनी ‘नवा नेता आला तर काय सांगता येत नाही’ असे म्हटले. एव्हढेच नाही तर ट्रम्प यांनी भविष्यात भारताला भेट देणार असल्याचे देखील संकेत दिले आहेत.

