Friend steals jewelry and cash worth 6 lakhs from girlfriends house in pune; पुण्यात तरुण मैत्रिणीच्या घरी गेला, ती कामानिमित्त बाहेर जाताच डाव साधला; दागिन्यांसह रोख रक्कमही पळवली
Friend steals jewelry and cash worth 6 lakhs from girlfriends house in pune; पुण्यात तरुण मैत्रिणीच्या घरी गेला, ती कामानिमित्त बाहेर जाताच डाव साधला; दागिन्यांसह रोख रक्कमही पळवली
Pune News: घरी आलेल्या मित्रानेच सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लुटल्याची घटना पुणे शहरात घडली असून याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे चोरी प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे: मित्राने मैत्रिणीच्या घरातून सोन्याचे दागिने व रोकड असा सहा लाख २४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. मैत्रीण मावशीच्या घरी जेवणाचा डबा देण्यासाठी गेली असताना, मित्राने चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याविरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी २५ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यामध्ये मित्राने दागिने व रोकड चोरल्याचा संशय व्यक्त केला आहे. ही घटना गुरुवारी (२५ जून) रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास कोंढव्यातील एका सोसायटीत घडली. तक्रारदार तरुणी या सोसायटीत राहते. आरोपी तिचा मित्र असून, घटनेच्या दिवशी तो तिच्या घरी आला होता. त्या वेळी तरुणी मावशीच्या घरी जेवणाचा डबा देण्यासाठी गेली. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने कपाटातून सोन्याचे दागिने व रोकड चोरली, असे तक्रारीत नमूद आहे. सहायक निरीक्षक आनंद थिटे तपास करीत आहेत.
मिठाईच्या दुकानात चोरी
शिवाजीनगर रेल्वेस्थानकाजवळ इमारतीत तळमजल्यावरील मिठाई दुकानाचे शटर उचकटून चार चोरट्यांनी २५ हजार रुपयांची रोकड आणि दोन मोबाइल संच लांबविले. याबाबत मिठाई विक्रेत्याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली.
दुसरीकडे, चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील अडीच लाख रुपयांची रोकड चोरल्याची घटना सूस रस्त्यावरील अपार्टमेंटमध्ये घडली. याबाबत एका तरुणाने बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुण कुटुंबीयांसमवेत सूस रस्त्यावरील एका अपार्टमेंटमध्ये राहायला आहे. त्याचे घर बंद असताना चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर शयनगृहातील कपाट उचकटून अडीच लाख रुपयांची रोकड लंपास केली. घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासत आहेत. उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे तपास करीत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा