- Marathi News
- Opinion
- Pandit Vijay Shankar Mehta Column: Dont Get Disturbed When Insulted | Ego Removal
6 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

भक्तांचे हित साधण्याची देवाकडे स्वतःची एक वेगळी पद्धत आहे. समजा एखाद्या लहान मुलाच्या शरीरावर फोड आला, तर आई त्याचे उपचार करते. उपचारादरम्यान त्याला थोडी वेदना होते. पण आईला माहीत असते की, भविष्यात हा फोड त्रास देणार नाही. तसेच देवभक्तांच्या परिस्थितीमध्ये वेळोवेळी बदल करतो. त्यापैकी एक म्हणजे‘अहंकार’ काढून टाकणे.
आपण कोणत्याही प्रवासाला निघालो, तर सामानाचे वजन कमी असेल, तितका तो प्रवास सुखकर होतो. जीवनाच्या प्रवासाचे तीन टप्पे आहेत – पहिला टप्पा म्हणजे जन्म(बसणे), दुसरा संसार (चालणे) ,तिसरा मृत्यू (उतरणे).
प्रवासात अहंकाराचे ओझे जास्त असल्यास अडखळायला होणारच. तुलसीदासजींनी लिहिले – ‘तिमि रघुपति निज दास कर हरहिं मानहित लागि।’ अर्थात भगवान श्रीराम भक्ताच्या हितासाठीच अहंकार काढून घेतात. म्हणूनच अपमान होईल. तेव्हा विचलित होऊ नका. उलट, हा अपमान आपल्याला अहंकारमुक्त करण्यासाठीच घडला आहे, असा विचार करा.
