France Heatwave: उष्णतेच्या त्या भयंकर लाटेनंतर फ्रान्समध्ये उष्णता निरीक्षण इशारा प्रणाली सुरू करण्यात आली होती. युरोपमध्ये तापमानवाढ झाली आहे.

संपूर्ण फ्रान्समध्ये प्रखर सूर्यप्रकाश कायम असून, देशभर असह्य आणि थकवणाऱ्या उष्णतेचा अनुभव येत आहे. शाळा, रेल्वे आणि क्रीडा स्पर्धांवर उष्णतेमुळे परिणाम होत आहे. उष्णतेची ही परिस्थिती आठवड्याच्या अखेरपर्यंत कायम राहणार असून अनेक शहरांमध्ये दिवसाचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिक राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Hormuz Standoff: इराण हट्टाला पेटूनच, समुद्रात हॉटलाइन उभारणार; म्हणाले – होर्मुझवर फक्त आमचंच नियंत्रण, सामुद्रधुनी पुन्हा पूर्वीसारखी होणार नाही!
वर्षभरात आणखी विक्रमी तापमान अपेक्षित आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. ऑगस्ट २००३ मध्ये आलेल्या उष्णतेच्या तीव्र लाटेशी या परिस्थितीची तुलना केली जात आहे. त्यावेळी उच्च तापमानामुळे सुमारे १५ हजार मृत्यू ओढवले होते. त्यामध्ये वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता.
Romanch Mahajan : घोडागाडीतून आई पडली, 18 वर्षांच्या लेकाचा जीव घाबरा, आईला वाचवण्याच्या नादात तरुणाने जीव गमावला, महाजन कुटुंबावर शोककळा
ब्रिटनमध्येही उष्णतेची लाट
ब्रिटनमध्येही उष्णतेची लाट आली असून बुधवार आणि गुरुवारी तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण इंग्लंडमध्ये सुमारे ३७ अंश सेल्सिअस तापमानाची अपेक्षा आहे, तर आग्नेय वेल्समध्ये ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचू शकते, असे सांगण्यात आले. शुक्रवारपर्यंत तापमान कमी होईल, असा अंदाज आहे.
नेपाळमध्ये ‘बर्ड फ्लू’
काठमांडू : नेपाळमध्ये ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग वेगाने वाढत आहे. देशातील अकरापैकी सात जिल्ह्यांमध्ये बाधा झाल्याचे आढळून आले आहे. अन्य चार जिल्ह्यंमध्ये संसर्ग होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. बर्ड फ्लू’ला रोखण्यासाठी साडेपाच लाखांपेक्षा अधिक कोंबड्या व दहा लाख अंडी नष्ट केली आहेत.

