ऑगस्ट महिना भारतीय शेअर बाजारासाठी विशेष महत्वाचा
FPI म्हणजे भारतीय शेअर बजारात किंवा डेट मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे परदेशी गुंतवणूकदार/फंड. भारतीय बाजारात FPI चा घसरलेला काटा ऑगस्ट 2026 महिन्यात पुन्हा वधारताना दिसत आहे. मुळात, ही सुरुवात जुलै 2026 मध्येच झाली होती. परंतु, FPI ची भारतीय बाजारातील वाढती खरेदी तात्पुरती आहे की पुढेही सुरूच राहील हे ठामपणे सांगणे कठीण आहे. ऑगस्ट 2026 मध्ये FPI तून एकूण ₹23,544 कोटी गुंतवणूक परदेशी गुंतवणूक उभी राहिली तर जुलै 2026 मध्ये ₹20,200 कोटी परदेशी गुंतवणूक तयार झाली. एकंदरीत, दोन महिन्यात परदेशातील गुंतवणूकदारांनी एकूण ₹43,744 कोटींची गुंतवणूक भारतीय बाजारात केली आहे.
4 महिन्यांसाठी सलग विक्री
आता भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांचा कल जरी वाढत असला तरी 2026 वर्षातील FPI चा आकडा अजूनही नकारात्मक आहे. गेल्या दोन महिन्यात भारतात एकूण ₹43,744 कोटींची परदेशी गुंतवणूक आली. परंतु त्या आधीच्या चार महिन्यात एकूण ₹2,60,150 कोटींची परदेशी गुंतवणूक भारतीय शेअर बाजारातून बाहेर गेली आहे.
मग भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांचा कल अचानक कसा वाढला?
परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय कंपन्यांच्या काही गोष्टींनी तथा झालेल्या सुधारणांनी आकर्षित केले आहे. मुळात, या गोष्टी भारतीय गुंतवणूकदारांसाठीही महत्वाच्या आहेत. देशातील काही कंपन्यांनी तिमाही निकालाच्या जोरावर परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा जिवंत केला आहे. कंपन्यांचा दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. मुख्य म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भारताचा रुपया स्थिरावला आहे त्यात फार मोठी घसरण झाल्याचे दिसून आले नाही. एखाद्या देशाचे चलन स्थिर असणे परदेशी गुंतवणूकदारांना जास्त आकर्षित करते. तसेच बहुतेक परदेशी गुंतवणूकदारांनी Chip Market पडून बाहेर पडून पैसा भारतीय बाजाराकडे वळवला आहे. फक्त शेअर बाजार नव्हे तर भारतातील Debt Market मध्येही परदेशी गुंतवणूक वधारली आहे.
सरकारी गोल्ड बॉन्ड रीडीम करण्याचे कॅलेंडर जारी! दोन वेगवेगळ्या तारखांमुळे उडतोय गोंधळ? समजून घ्या सोप्या भाषेतभारतीय बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांचा वाढता कल देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक तर आहेच पण जागतिक बाजारपेठेतील घडामोडी, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि अमेरिका-इराण देशांतील तणाव भारतीय बाजारावर दबाव तयार करून आहेत.

