Headlines

FMCG GOODS RATE HIKE, महागाईचा बॉम्ब फुटणार! सर्वसामान्यांच्या खिशाला युद्धाची झळ; सणासुदीच्या तोंडावर रोजच्या वापरातील वस्तू महागणार, पाहा यादी


पावसाळ्याचा ऋतू सुरु आहे. पावसाळ्याच्या मध्यातच देशात सणउत्सवांना सुरुवात होते. हा हंगाम म्हणजे सणउत्सव आणि उत्साहाचा हंगाम! अगदी वर्षाच्या शेवटपर्यंत हा हंगाम सुरु असतो. देशभरात सणांच्या तयारीला सुरुवातही झाली आहे. अवघ्या काहीच दिवसांत गणपती बाप्पाचे आगमनही होईल. तसेच गोपाळकाला, रक्षाबंधन आणि ओणमसारख्या विविध पावसाळी सणांमुळे देशभरात उत्साह पाहायला मिळेल. त्यानंतर नवरात्री, दिवाळी, दसरा आणि बरीच सणं!

देशात जसे सण-उत्सवाचे वातावरण सुरु होते तसे सामान्य घरातील खर्चही वाढतात. बहुदा यंदाचे सण-उत्सव सामान्य घरांसाठी जास्त खर्चिक ठरणार आहे. पश्चिम आशियाई देशांमध्ये वाढत्या तणावाचा परिणाम भारतातील सामान्य कुटुंबियांच्या खिशावर होताना दिसत आहे. मुळात, यामागे अनेक कारणेही आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या मालाची किंमत वाढली आहे. FMCG कंपन्यांनी कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे होणारा दबाव कमी करण्यासाठी ग्राहकांच्या खिशाला कात्री लावली आहे. परिणामी, दैनंदिन जीवनातील वापरात येणाऱ्या वस्तूंची किंमत वाढली आहे. या वस्तूंमध्ये टूथपेस्ट, डिटर्जंट, पेंट, चहा यांचा समावेश आहे.

स्वतः हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) ने चाहूल दिली आहे की, येत्या काही दिवसांत डिटर्जंट तसेच कपडे धुण्याच्या बारसह संबंधित उत्पादनांची किंमत वाढवण्यात येणार आहे. परदेशात असणाऱ्या तणावपूर्ण वातावरणामुळे कच्च्या तेलाची किंमत वाढली आहे. याचाच परिणाम म्हणून कच्च्या तेलापासून तयार होणाऱ्या वस्तूंची किंमतही वाढणार आहे. त्यामुळे सौंदर्यप्रसाधनांच्या किमतीतही वाढ दिसून येऊ शकते.

येत्या दिवसांत कोणत्या भारतीय कंपन्यांमध्ये किंमतवाढ दिसून येईल आणि का?

सणासुदीचे दिवस उंबरठयावर आहेत. अशामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरसहित एशियन पेंट्स, Havells तसेच इतर FMCG कंपन्यांच्या दरात वाढ दिसून येऊ शकते. परदेशात कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे भारतीयांच्या खिशाला कात्री लागणार आहे. तसेच मध्य पूर्वी आशियाई भागात वाढत्या तणावामुळे जगभरातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याचाच परिणाम Freight Cost वाढला आहे. परिणामी, भारतात दैनंदिन जीवनातील वापराच्या वस्तू महागणार आहेत.

वाढता दबाव कमी करण्यासाठी ग्राहकांचा वापर?

नवरात्र, दिवाळी, रक्षाबंधन आणि बरेच सण आता उंबरठ्यावर आहेत. हा सणांचा हंगाम म्हणजे कंपन्यांसाठी सुवर्णसंधी असते. या हंगामात कंपन्या जास्तीची कमाई करतात. अशामध्ये काही वृत्तांनुसार, सध्या देशातील ग्रामीण आणि शहरी भागात स्थिर मागणी दिसत आहे, त्यामुळे कंपन्यांसाठी दरवाढीसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते. जून महिन्यात किरकोळ विक्रीत 6 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे, जी मे महिन्यापेक्षा उत्तम आहे. युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका कच्च्या मालावर होत आहे, जेणेकरून अनेक भारतीय कंपन्या सध्या दबावाखाली आहेत, त्यामुळे येत्या सणासुदीच्या काळात वाढत्या दरांचा अंदाज पाहता कंपन्या स्वतःचा दबाव कमी करण्यासाठी ग्राहकांचा वापर करत आहेत अशी चर्चा सुरु आहे.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत