Headlines

Fight Over Samosas Turns Violent at Pune Sweet Shop CCTV Video Goes Viral | ‘आधी आम्हालाच समोसे द्या!’ पुण्यात समोशांवरून राडा, ग्राहकानं दुकानदाराला चोपलं, CCTV व्हिडीओ व्हायरल


CCTV Viral Video: पुण्यात समोसे आधी कोणाला द्यायचे, या किरकोळ कारणावरून ग्राहक आणि दुकानातील कर्मचाऱ्यामध्ये वाद होऊन हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे समाजातील वाढती आक्रमकता आणि कमी होत चाललेला संयम या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Samosa Fight in Pune
(फोटो सौजन्य – @VaradBhatkhande/x.com)
घरातील ज्येष्ठ मंडळी अनेकदा सांगतात, “संयम ठेवा.” कारण क्षेत्र कुठलंही असो, संयम ही माणसाची सर्वात मोठी ताकद मानली जाते. पण आता माणसाचं आयुष्य धावपळीचं झालं आहे. आणि या बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांमधील संयम कमालीचा कमी झाल्याचं जाणवतं. लोकं छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडतात. काही जण तर थेट हाणामारीवर उतरतात. होय, आता हे पुण्यातील प्रकरणच पाहा ना. विक्रेत्याने समोसे उशिरा दिल्यामुळे ग्राहक चिडला आणि त्यानं थेट हाणामारीच केली. समोशांचं हे प्रकरण आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं आहे. या भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तो पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

कसं सुरू झालं भांडण?

कसं सुरू झालं भांडण?

हा व्हिडीओ @VaradBhatkhande या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील शिवशक्ती स्वीट होम या मिठाईच्या दुकानात घडली. तर घडलं असं की, ईश्वर रंगनाथ नवले आणि साई लक्ष्मण नवले हे दोघे समोसे खाण्यासाठी दुकानात गेले होते. मात्र, कर्मचारी राजू लाबूराम देवासी यांनी त्यांच्या आधी आलेल्या ग्राहकाऐवजी त्यांच्या नंतर आलेल्या ग्राहकाला आधी समोसे दिले. पैसे भरूनही आपल्याला आधी समोसे मिळाले नाहीत, यामुळे नवले बंधू चिडले आणि त्यांनी कर्मचाऱ्याशी वाद घातला. हा वाद पाहता पाहता हाणामारीपर्यंत पोहोचला आणि दोन्ही बाजूंमध्ये मोठी झटापट झाली. हे संपूर्ण प्रकरण दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झालं असून, आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
(फोटो सौजन्य – I Own My Food Art/pexels.com)

समोशांचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. CCTV फुटेज आणि तक्रारीच्या आधारे ईश्वर रंगनाथ नवले आणि साई लक्ष्मण नवले या दोघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. हा गुन्हा दुकानातील कर्मचारी राजू लाबूराम देवासी यांनी दिलेल्या तक्रारीवरून नोंदवण्यात आला. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. असो, पण समोशांसाठी झालेल्या या भांडणाबाबत तुमचं काय मत आहे? तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की द्या.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा