4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

2026च्या फिफा विश्वचषकाची सुरुवात वादांनी झालीहोती. इराणच्या खेळाडूंना व्हिसा मिळणार की नाही, हाप्रश्न चर्चेत होता. त्यांच्याशी झालेल्या कथितभेदभावपूर्ण वागणुकीनेही अनेक प्रश्न उपस्थित केले.पंचांचे काही निर्णय अर्जेंटिनाच्या बाजूने झुकतअसल्याची चर्चा रंगली. बालोगुन वादात अमेरिकेचेअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही उडी घेतली. ट्रम्प आणिफिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांच्यातील चर्चेचीहीजोरदार चर्चा झाली.
व्हिडिओ सहाय्यक पंच (व्हीएआर) प्रणाली पुन्हावादाच्या केंद्रस्थानी राहिली. त्यात अमेरिका, कॅनडा व मेक्सिको या तीन यजमान देशांतील प्रवासाचा त्रासआणि त्यावरील प्रचंड खर्च यांचीही भर पडली. तरीहीहा विश्वचषक अपयशी ठरला, असे म्हणता येणारनाही. कारण स्पर्धेतील फुटबॉलचा दर्जा आणिसामन्यांतील चुरस सर्वोच्च पातळीची होती.
अंतिम सामना स्पेनच्या एकतर्फी वर्चस्वाखाली झाला असला, तरी संपूर्ण स्पर्धेत अनेक सामने दीर्घकाळस्मरणात राहतील, असे ठरले. फ्रान्सविरुद्ध स्पेनचाभक्कम बचाव असो किंवा इंग्लंडविरुद्ध अर्जेंटिनाचीदमदार पुनरागमनाची कामगिरी, स्पर्धा अखेरपर्यंतरोमहर्षक राहिली. उपांत्य फेरीतील सामना त्याचे उत्तमउदाहरण ठरला. इंग्लंड 1-0 अशी आघाडीवर असतानाब्रिटनमध्ये विजेतेपदाची स्वप्ने रंगू लागली होती. मात्रप्रशिक्षकांनी बचावात्मक धोरण स्वीकारताच 39 वर्षीयलिओनेल मेसी यांना जणू नवे बळ मिळाले.
अर्जेंटिनाने झंझावाती खेळ करत सामना फिरवलाआणि अटलांटातील स्टेडियम अर्जेंटिनाच्या चाहत्यांच्याजल्लोषाने दुमदुमले. त्याच वेळी लंडनमधील एकापबमध्ये मात्र शांतता पसरली होती. आफ्रिकन संघांनीहीया स्पर्धेत ठसा उमटवला. प्रथमच या खंडातील नऊसंघांनी विश्वचषकात सहभाग घेतला. केप व्हर्डेसारख्याअवघ्या पाच लाख लोकसंख्येच्या देशाने अर्जेंटिनालापराभवाच्या उंबरठ्यावर नेले, तर इजिप्तने 2-0 अशीआघाडी घेतल्यानंतरही 2-3 असा पराभव स्वीकारला.मोरोक्कोने कतार विश्वचषकातील उपांत्य फेरीनंतर यंदाउपांत्यपूर्व फेरी गाठत सातत्यपूर्ण कामगिरी सिद्ध केली.
या स्पर्धेनंतर आफ्रिकन खेळाडूंना जगातील प्रमुखलीगमध्ये अधिक संधी मिळण्याची शक्यता वाढलीआहे. क्रिस्टियानो रोनाल्डो, नेमार आणि लिओनेलमेसी या तिन्ही दिग्गजांवरही सर्वांचे लक्ष होते. रोनाल्डो यांनी पोर्तुगालला पुढे नेण्यासाठी सर्वस्व पणालालावले, मात्र उपांत्यपूर्व फेरीत स्पेनकडून पराभूतझाल्यानंतर अश्रूंनी निरोप घेतला. नेमारने ब्राझीलसाठीअखेरच्या सामन्यात पेनल्टीवर गोल केला, पण त्यांचीविश्वचषकातील अखेर अपेक्षेप्रमाणे झाली नाही. मात्रमेसीबाबत सर्व प्रश्न संपले.
अंतिम सामना गमावला असला तरी त्यांनी संपूर्ण स्पर्धेतअर्जेंटिनाचे नेतृत्व ज्या पद्धतीने केले, त्यामुळे तेसर्वकालीन महान फुटबॉलपटू असल्याचे पुन्हाअधोरेखित झाले. एकूणच, अनेक वाद असूनही हाविश्वचषक फुटबॉलप्रेमींसाठी संस्मरणीय ठरला.मैदानावरील दर्जेदार खेळ आणि चाहत्यांचा उत्साहयामुळे फुटबॉलला जगातील सर्वात सुंदर खेळ काम्हटले जाते, याची पुन्हा प्रचिती सर्वांनाच आली.भारतासारख्या 1.4 अब्ज लोकसंख्येच्या देशाकडेअजूनही विश्वस्तरीय फुटबॉल संघ नसल्याची खंतकायम आहे. मात्र ओसीआय (ओव्हरसीज सिटिझनऑफ इंडिया) आणि पीआयओ (भारत वंशाचे परदेशीनागरिक) खेळाडूंचा प्रभावी वापर केल्यास भारतालाहीभविष्यात विश्वचषकात स्थान मिळू शकते. तोपर्यंतस्पॅनिश फुटबॉलचे वर्चस्व कायम असून नेतृत्वाचीमशाल मेसीकडून लामिन यामालकडे जाताना दिसतआहे.तो प्रामुख्याने उजव्या विंगर म्हणून खेळतो आणिवेग, अप्रतिम ड्रिबलिंग, अचूक पासिंग तसेच गोलकरण्याची क्षमता यासाठी ओळखला जातो.स्पेनच्याराष्ट्रीय संघाकडून खेळताना त्याने अनेक विक्रम केले.कमी वयात आंतरराष्ट्रीय पदार्पण आणि गोल करणाऱ्याखेळाडूंपैकी तो एक आहे. (लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे)
हा एक संस्मरणीय विश्वचषक ठरला.अनेक वाद निर्माण होऊनही मैदानावरपाहायला मिळालेला दर्जेदार फुटबॉलप्रत्येक चाहत्याच्या कसोटीवर उतरला.स्पर्धेदरम्यान चाहत्यांनी दाखवलेलाउत्साह, जिद्द, खेळावरील प्रेम याने पुन्हाएकदा सिद्ध केले की, फुटबॉललाजगातील सर्वात सुंदर खेळ का म्हटलेजाते.

