Headlines

FDA ची Blink IT डार्क स्टोअरवर धडक कारवाई, अॅमेझॉनलाही दणका



१० ते १५ मिनिटांत भाजीपाला, फळांपासून ते अगदी किराणा सामान ते घरात लागणाऱ्या छोट्यामोठ्या गोष्टी घरपोच पोहोचवणाऱ्या ‘ब्लिंकिट’सारख्या अ‍ॅपवरून तुम्ही नियमित खरेदी करता का? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाने म्हणजेच ‘एफडीए’ने नियम मोडणाऱ्या आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ई-कॉमर्स आणि क्विक-कॉमर्स कंपन्यांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. मुंबईतील मालाड भागात असलेल्या ब्लिंकिटच्या गोदामावर कारवाई करत त्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे, तर दुसरीकडे भिवंडीतील गोदामाप्रकरणी अॅमेझॉनला मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही अंतरिम दिलासा मिळालेला नाही. एफडीएनं केलेली कारवाई, अॅमेझॉन कंपनीच्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीत नेमकं काय घडलं? या कंपन्यांवर नेमके काय आरोप आहेत? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत