Headlines

Fake kidnapping of school girl in sindhudurg police search operation updates; कारमधून शाळकरी मुलीचं अपहरण, भावाने पोलिसांना सांगितलं; अख्खी यंत्रणा राबली, मध्यरात्री वेगळीच माहिती उघड


Sindhudurg Crime News: यात एका कारमधून काही तरुण उतरले आणि या तरुणांनी माझ्या बहिणीला उचलून गाडीत घातले, नंतर तिला इंजेक्शन देण्यात आलं, असं भावाने पोलिसांना सांगितलं.

sindhudurga girl kidnapping
अभ्यासाला कंटाळून आठवीतल्या मुलीने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सिंधुदुर्ग: अभ्यास करण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींकडून सतत सूचना दिल्या जात असल्याच्या रागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने ख्ख्या भावाच्या मदतीने अपहरण झाल्याचा बनव रचल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री 9 वाजता या मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल होताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर होती. मात्र याप्रकरणी नंतर वेगळंच सत्य समोर आलं आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या गंभीर प्रकरणात लक्ष घालून नाकाबंदीचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे नाकाबंदी करण्यात आली. शाळकरी मुलगीने गुरूवारी संध्याकाळी भावाला ‘माझे अपहरण झाल्याचे कुटुंबियांना सांग’ असे सांगितले. त्याप्रमाणे भावानेही तिला मदत केली. गुरुवारी सायंकाळी ही मुलगी मालवण शहरात दाखल झाली. रात्री शहरात राहून तिने एका घरात जेवणाचाही आस्वाद घेतला होता. मुलीच्या सांगण्याप्रमाणे तिच्या भावानेही मुलीच्या अपहरणाचा बनाव हुबेहुबपणे पोलीस यंत्रणांना सांगितला. यात एका ओमनी कारमधून काही युवक उतरले, त्यांनी तिला उचलून गाडीत घातले, तिला इंजेक्शन देण्यात आले आणि घेऊन गेल्याचे सांगितले.

या घटनेनंतर पोलिसांनी सर्व रस्त्यांवरील आणि घराबाहेरीलही सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सर्वत्र नाकाबंदी करून शोध मोहीम राबविली. जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी स्वतःहून याप्रकरणी तपास यंत्रणांना सूचना दिल्या होत्या. जिल्ह्यातील शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रकार गंभीर असल्याने त्यांनी गांभीर्यपूर्वक सर्व तपास सुरू केला होता. यासाठी जिल्ह्यातील अनेक टीम मालवणमध्ये मालवण पोलिसांच्या मदतीला दाखल झाल्या होत्या. रात्रभर सर्वत्र शोध मोहीम राबवण्यात आली होती.

अखेर मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास मोबाईल लोकेशनच्या सहाय्याने शहरातीलच एका भागात तिचे वास्तव्य आढळून आल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. यावेळी उलट तपासणीत तिने स्वत:च्या अपहरणाचा बनाव आपणच रचल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा