Headlines

Faissal Khan Apologises To Aamir Khan And Family ; Faissal Khan : गंभीर आरोप करुन तोडलेले संबंध पुन्हा जोडले! फैसल खानने आमिर खानची मागितली माफी,कौटुंबिक कलह दूर


Faissal Khan Apologies Aamir Khan : फैसल खानने वर्षभरापूर्वी भाऊ आमिर खान आणि कुटुंबाशी सर्व संबंध तोडले होते आणि त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. आता त्याने कुटुंबाशी पुन्हा जुळवून घेतले असून माफीही मागितली आहे.

aamir khan
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
गेल्या वर्षी, अभिनेता आमिर खानचा भाऊ फैसल खानने एका पत्रकार परिषदेत आमिर आणि त्यांच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले होते. तसेच त्यांच्याशी असलेले संबंध तोडले असल्याचेही स्पष्ट केलेले. मात्र, आता फैसल खानने आमिर तसेच आपली आई, बहीण आणि उर्वरित कुटुंबाची माफी मागितली आहे. आपली चूक मान्य करत, फैसलने कबूल केले की कुटुंबावर जाहीरपणे आरोप करणे ही त्याची एक मोठी चूक होती. अभिनेत्याने सांगितले की, कोण बरोबर किंवा कोण चूक यावर विचार करत बसण्यापेक्षा, आता कुटुंबात शांतता राखण्याला तो प्राधान्य देत आहे.

एका मुलाखतीत फैसल खान म्हणाला, “सर्वात आधी, मला माझ्या आईची माफी मागायची आहे. मला निखतची माफी मागायची आहे. मला संतोषची माफी मागायची आहे. तसेच मी आमिरचीही माफी मागतो. मनातला राग आणि मी दुखावलो गेलो होतो त्यामुळे मी अशा गोष्टी बोललो ज्या मी कधीच बोलायला नको होत्या.”

Maharashtra TimesTharala Tar Mag : 25 वर्षांपूर्वीच्या अपघाताची पुनरावृत्ती! राकेश घेणार नागराजचा बदला, सायलीला भूतकाळ आठवला पण जीव धोक्यात

कुटुंबाविरुद्ध जाहीरपणे बोलणे ही सर्वात मोठी चूक

फैसल खानने कबूल केले की, आपल्या कुटुंबाविरुद्ध जाहीरपणे बोलणे ही त्याच्या सर्वात मोठी चूक होती. हे प्रश्न त्यांनी आपापसात सोडवायला हवे होते. तो म्हणाला, “मी त्या गोष्टींवर जाहीरपणे चर्चा करायला नको होती. त्याऐवजी, मी माझ्या कुटुंबासोबत बसून त्याबद्दल बोलायला हवे होते. मला आता कोणाकडूनही कोणत्याही उत्तरांची अपेक्षा नाही. मी बरोबर आणि दुसरं कोणीतरी चूक, हे मला सिद्ध करायचे नाही. सत्यापेक्षा मला शांतता हवी आहे. मला माझ्या कुटुंबासोबत गुण्यागोविंदाने राहायचे आहे.”

Maharashtra TimesRam Kapoor : ‘राम कपूरचं डोकं फिरलंय!’ लग्नात चीटिंग ही बाब अगदीच सामान्य, अभिनेत्याच्या विधानावर प्रेक्षक नाराज, झाला टिकेचा धनी

कुराणने दाखवला मार्ग: नातेसंबंध जपणे सर्वात महत्त्वाचे

फैसल खानने सांगितले की, कुराणमुळे त्यांचा दृष्टिकोन बदलण्यास मदत झाली. त्याला एक अशी आयत आढळली ज्यात कौटुंबिक संबंध टिकवून ठेवण्यावर भर दिला होता; यातून प्रेरणा घेऊन त्याने पुन्हा आपल्या कुटुंबाशी आणि प्रियजनांशी नाते जोडले. फैसल म्हणाले, “कोणी काय केले होते याचा विचार न करता मी भूतकाळ मागे सोडण्याचा निर्णय घेतला. नातेसंबंध जपणे हे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे.”

त्याने अम्मी, निखत आणि आमीर यांना फोन करून माफी मागितली. फैसल खान म्हणाला, “मला जाणीव झाली की मी माझ्या कुटुंबापासून दुरावलो होतो. तेव्हाच मी पुढाकार घेण्याचे ठरवले. मी सर्वात आधी माझी बहीण निखतला फोन केला; तिने लगेच फोन उचलला. तेव्हाच मला समजले की माझी आई माझी आठवण काढत होती. हे ऐकून मी भावूक झालो आणि दुसऱ्याच दिवशी मुंबईला जाण्यासाठी विमान पकडले. आईला भेटून आणि तिची माफी मागितल्यानंतर, मी आमिरची माफी मागून मला माफ करण्यास सांगितले. मी त्याला म्हणालो, ‘मी जे काही केले ते करायला नको होते. कृपया मला माफ कर.’ फैसलच्या म्हणण्यानुसार, त्याच्या कुटुंबाने त्याचे उबदारपणे आणि प्रेमाने स्वागत केले, ज्यामुळे अनेक वर्षांपासून चालत आलेल्या गैरसमजांचा अंत झाला.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा