Eva Grover : टीव्ही अभिनेत्री इवा ग्रोव्हरनं आमिर खानचा सावत्र भाऊ हैदर अली खानसोबत लग्न केलेलं. मात्र, हैदरनं इवाचा शारीरिक छळ केला. याबद्दल तिनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – करिश्मा का करिश्मा’, ‘कोरा कागझ’ आणि ‘बिदाई’ यांसारख्या मालिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री इवा ग्रोव्हरने नुकताच एका मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. इवा ग्रोव्हरचं लग्न आमिर खानचा सावत्र भाऊ हैदर अली खानसोबत झालं होतं. या लग्नात अभिनेत्रीला प्रचंड त्रास आणि शारीरिक छळ सहन करावा लागला. हैदरने अभिनेत्रीवर काम मिळवण्यासाठी दाबावही टाकलेला, याबद्दलही तिनं मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
हैदर अली खानसोबतच्या लग्नाबद्दल बोलताना इवा ग्रोव्हर म्हणाली की, ‘माझ्या मैत्रिणीने माझी हैदर अली खानसोबत ओळख करून दिलेली. त्यावेळी तो चांगल्या ठिकाणी नोकरीला होता आणि त्याला पगारही चांगला होता. १८ दिवसांच्या डेटिंगनंतर त्याने मला लग्नासाठी विचारलं. माझ्या आईचा या लग्नाला विरोध होता. पण, मी प्रेमाखातर लग्नासाठी होकार दिला. या लग्नात मला खूप छळ सहन करावा लागला. मुल झाल्यावर सगळं ठीक होईल असं वाटलेलं, पण तसं झालं नाही.’ Prakash Raj : ‘हुकुमशाहीसारखं वागणारं घाबरट सरकार’, सोनम वांगचुक यांना रुगणालयात दाखल केल्याप्रकरणी प्रकाश राज यांची मोदी सरकारवर टीका हैदरच्या आजाराबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली की, ‘हैदरला स्क्रिजोफेनिया होता आणि या आजाराबद्दल मला आधी माहित नव्हतं. त्याने मला मारहाण केली. दारू पिऊन येऊन तो मला मारायचा. लग्नाआधी मला याबद्दल माहित नव्हतं. लग्नाच्या ३ दिवसात त्याचं खरं रूप माझ्यासमोर आलं.त्याने नोकरीही सोडलेली. मी याबद्दल कोणाला सांगू शकत नव्हते. हैदर माझ्यावर संशय घ्यायचा.’
Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा
इवा ग्रोव्हरनं सांगितला प्रसंग
पुढे इवा म्हणाली की, ‘हैदरने मला काम मिळवण्यासाठी निर्मात्यांसोबत शारीरिक संबंध ठेवायला सांगितले होते. माझ्यावर दबाव टाकण्यात आलेला. माझा नवरा मला म्हणालेला, ‘काय फरक पडतो. तुला करावं लागेल. तुला घर चालवायचंय, मुलीचा खर्च करायचाय. अभिनेत्रींना प्रपोजल येतात.’ त्यावेळी मी त्याच्यासोबत घटस्फोट घेण्याचं ठरवलं. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये इवा बोलत होती. Medha Manjrekar : ‘ट्रीपवरून आल्यावर टेस्ट केली, 8 महिन्यांपासून कॅन्सरचा प्रवास सुरू आहे’, आजारपणावर मेधा मांजरेकर यांची प्रतिक्रिया या काळात, इवा ‘वक्त बतेगा कौन अपना कौन पराया’ या शोमध्ये काम करत होती. अभिनेत्रीनं सांगितलं की, शोमधील तिच्या सहकलाकारांना तिला होणाऱ्या त्रासाबद्दल समजलं आणि जेव्हा तिला सर्वात जास्त गरज होती तेव्हा ते कलाकार तिच्या मदतीला धावून आले. एके दिवशी, संपूर्ण युनिटनं अभिनेत्रीला मदत करण्याचा निर्णय घेतला. सगळे कलाकार इवाच्या घरी गेले आणि आईला समजावलं. शो मधील कलाकार या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी अभिनेत्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा