Headlines

Ethanol mixed fuel damage vehicles arai directors clarification; इथेनॉल-मिश्रित इंधनामुळे वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड? देशभर चर्चा रंगताच ARAI संचालकांकडून खुलासा


म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘ई २०’ (इथेनॉल-मिश्रित इंधन) यामुळे वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिघाड होत असल्याचे कोणतेही चित्र दिसत नाही,’ असे स्पष्टोक्ती ‘दि ऑटोमोटिव्ह रिसर्च एसोसिएशन ऑफ इंडिया’चे (एआरएआय) संचालक डॉ. रेजी मथाई यांनी केली. वाहन उत्पादक कंपन्यांच्या अधिकृत सेवा केंद्रांमध्ये ‘ई २०’मुळे उद्भवलेल्या गंभीर तक्रारींचा मोठा ओघ दिसत नाही. जर एखाद्या वाहनात समस्या जाणवत असेल; तर ग्राहकांनी थेट अधिकृत विक्रेत्याकडे (डीलर) जाऊन वाहनाची तपासणी करून घ्यावी, असेही आवाहन त्यांनी या वेळी केले.

ऑटोमोटिव्ह इंधन म्हणून ‘ई २०’ (इथेनॉल-मिश्रित इंधन) बाबतची अद्ययावत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. मथाई बोलत होते. ते म्हणाले, ‘इथेनॉलचा वापर करण्यापूर्वी त्याबाबतच्या आवश्यक त्या चाचणी आणि अभ्यास पूर्ण करण्यात आले आहेत. संबंधित चाचण्यांमध्ये आठ ते दहा वर्षाच्या जुन्या दुचाकी, चारचाकी वाहनासह नवीन बीएस ४ वाहनांचीही तपासणी करण्यात आली. वेगवेगळ्या ४० ते ५० हजार किलोमीटर अंतराची चाचणी करून त्याचे निकाल पाहून त्याचा वापर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.’

‘इथेनॉलचा वापर करीत असताना त्यामुळे वाहनांच्या मायलेजवर दोन ते सहा टक्क्यांपर्यंत परिणाम होत असतो. मात्र, त्याचा कोणताही विपरीत परिणाम वाहनांच्या कार्यक्षमतेवर होत नाही. उत्पादकांनीही जे आवश्यक बदल वाहनात हवे आहेत, त्याबाबतची खबरदारी घेतली, त्यामुळे नवीन वाहनांवर याबाबत परिणाम दिसून येत नाही. जी जुनी वाहने आहेत. त्यांची क्षमता वेगळी असल्याने त्याबाबतच्या तक्रारी काहीजण समाजमाध्यमांवर टाकत आहे. मात्र, वाहनांचे जे डीलर आहेत त्यांच्याकडे कोणत्याही तक्रारी दिल्या जात नाहीत,’ असेही डॉ. मथाई म्हणाले.

दरम्यान, ‘वाहनांचा वापर आपण कशाप्रकारे करतो यावरही वाहनांचा मायलेज अवलंबून असतो. इथेनॉलचा वापर वाहनांमध्ये २५ टक्के करीत असताना त्याबाबत आवश्यक ती तयारीदेखील गरजेची असते. त्यादृष्टीने अभ्यास करून बृहद आराखडा तयार करण्यात येत आहे. युद्धजन्य परिस्थितीत इंधनाचा तुटवडा जाणवत असल्याने; तसेच परदेशातून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आपण आयात करीत असल्याने देशांतर्गत बायो इथेनॉल वापरणे महत्त्वाचे आहे. वाहनांमध्ये ‘इथेनॉल कन्वर्जन कीट’ची परवानगी अद्याप सरकारने दिलेली नाही. त्यामुळे ग्राहकांनीही नियमाशिवाय संबंधित किटचा वापर करू नये. वाहनांच्या उत्सर्जनाच्या चाचणीसाठी भारत एक एप्रिल २०२७ पासून ‘वर्ल्डवाइड हार्मोनाइज्ड लाइट व्हेइकल टेस्ट प्रोसिजर’ ही जागतिक कार्यपद्धती स्वीकारणार आहे’, असेही डॉ. मथाई यांनी स्पष्ट केले.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत