Headlines

Eetha Movie : ‘टॉक्सिक’ सिनेमाचा श्रद्धा कपूरच्या सिनेमाला फटका! ‘ईठा’च्या निर्मात्यांचा महत्वाचा निर्णय, बदलली प्रदर्शनाची तारीख


Shraddha Kapoor Eetha Movie : श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.

Eetha Movie New Release Date
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटामुळे चर्चेत असून प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. आता, अभिनेत्रीच्या ‘ईठा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.

‘ईठा’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख

निर्मात्यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर केली आहे. चित्रपटाचं पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘ईठा’ नवीन वादळ घेऊन आहे, ४ डिसेंबरला.’

Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड

‘टॉक्सिक’मुळे प्रदर्शन पुढे ढकललं

‘ईठा’ हा चित्रपट २८ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु निर्मात्यांनी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. साऊथचा सुपरस्टार यशचा ‘टॉक्सिक’ हा चित्रपटही २६ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिसवर टक्कर टाळण्यासाठी निर्मात्यांनी ‘ईठा’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. ‘ईठा’ हा चित्रपट विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटातील तिचा फर्स्ट लूकही प्रदर्शित झाला असून, अभिनेत्रीच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Maharashtra TimesMehmood Son Lucky Ali : मेहमूद यांचा मुलगा, मीना कुमारींचा भाचा, ३ लग्न अन् घटस्फोट, नाही मिळालं खरं प्रेम; स्वतःच्या गाण्यानं चाहत्यांना लावतोय वेड

‘ईठा’चा एक दमदार टीझर

‘ईठा’चा टीझरही प्रदर्शित झाला असून, टीझरमध्ये श्रद्धा कपूरचा उत्कृष्ट अभिनय पाहायला मिळत आहे. टीझरमध्ये श्रद्धा कपूर गरोदर विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेत रंगमंचावर लावणी करताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या स्क्रीन प्रेझेन्सचं सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून चित्रपटात रणदीप हुड्डा देखील आहे.

अक्षय कुमारच्या चित्रपटाशी टक्कर होणार

‘ईठा’ हा चित्रपट अक्षय कुमारच्या एका विनोदी चित्रपटाशी टक्कर देणार आहे. अक्षय कुमारनं सह-लेखन केलेला आणि अनीस बाझमी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. श्री वेंकटेश्वरा क्रिएशन्स निर्मित या चित्रपटात विद्या बालन देखील मुख्य भूमिकेत आहे.

Maharashtra TimesAjit Vachani : अभिनेत्यानं बॉलिवूड गाजवलं, शाहीर साबळेंच्या लेकीसोबत लग्न; वयाच्या 52व्या वर्षी निधन, मुलगी आहे लोकप्रिय अभिनेत्री
दरम्यान, श्रद्धा कपूर शेवटची २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री २’ या चित्रपटात दिसली होती. आता प्रेक्षक तिला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.