Mohit Narayangaonkar On Eetha : ईठा हा सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच त्याच्या नावावरुन वाद निर्माण झाला होता. विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबियांनीच या नावावर नाराजी दर्शवलेली. पण आता त्यांच्या नातवाने ही नाराजी दूर झाल्याचे सांगितले आहे.

मात्र या सिनेमाबाबत वादही निर्माण झाला. काही दिवसांपूर्वी ईठा या शीर्षकावरून वाद निर्माण झाला होता. या नावावर विठाबाईंच्या कुटुंबीयांनीच आक्षेप घेतलेला. सिनेमाचे नाव बदलावे अशी मागणीही केलेली त्यामुळे सिनेमा रिलीज होईल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले. आता विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Tanvi Thakkar Divorce : लोकप्रिय अभिनेत्री तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया यांचा घटस्फोट, साखरपुड्यानंतर 7 वर्षांनी लग्न, मग 5 वर्षांनी काडीमोड!
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोहित नारायणगावकर यांनी सांगितले की निर्मात्यांनी दिलेल्या कारणामुळे आमच्या कुटुंबाची शंका आता दूर झाली आहे. सुरुवातीला आमची या चित्रपटाच्या शीर्षकावरून थोडी चिंता होती म्हणूनच आम्ही निर्मात्यांना ईठा ऐवजी विठाबाई नारायणगावकर असं नाव द्यावं अशी विनंती केलेली. मात्र नंतर निर्माते आणि दिग्दर्शकांनी आम्हाला या नावा मागचा त्यांचा विचार पटवून दिला. त्यांनी आम्हाला सांगितले की ग्रामीण महाराष्ट्रात लोक अजूनही विठाबाईंना ईठा म्हणूनच ओळखतात त्यामुळे या सिनेमासाठी हे नाव अगदी योग्य आहे. त्यांचं हे कारण ऐकल्यानंतर आमची शंका दूर झाली.
Alpha Box Office : प्रेक्षकांचा भ्रमनिरास! आलिया भट्ट-शर्वरी वाघची नाही चालली जादू, पहिल्याच दिवशी अल्फाची गटांगळी
त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे आमच्या कुटुंबाचे समाधान झाले असून ग्रामीण महाराष्ट्र आणि त्याची संस्कृतीची मुळे प्रामाणिकपणे पडद्यावर मांडल्याबद्दल चित्रपटाचे कौतुक आहे.मोहित यांनी चित्रपटाबाबत सांगितले की अतिशय सुंदर चित्रपट बनवला आहे. हा सिनेमा पाहिल्यावर लोक नक्कीच म्हणतील की तुम्ही खरोखरच तमाशा परंपरा आणि मराठी संस्कृतीचे वारसदार आहात… माझा विश्वास आहे की प्रेक्षक हा चित्रपट मनापासून स्वीकारतील. तसेच हा सिनेमा रिलीज व्हायच्या आधी श्रद्धा कपूर सह चित्रपटातील इतर कलाकारांनी टीम विठाबाईंच्या मूळ गावी नारायणगावला भेट देणार आहे.
Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा
विठाबाई नारायणगावकर यांच्या बद्दल सांगायचे झाल्यास त्या प्रसिद्ध तमाशासम्राज्ञी होत्या. त्यांच्या वडिलांचा स्वतःचा तमाशाचा फड होता. त्यामुळे अगदी बालपणापासूनच त्यांना तमाशा हा अगदी जिव्हाळ्याचा विषय. पुढे वडिलांच्या निधनानंतर त्यांच्यावर या तमाशा फडाची जबाबदारी आली. कुटुंबाचं व फडातील काम करणाऱ्या व्यक्तींच पोट सांभाळण्यासाठी त्या तमाशाचे खेळ लावू लागल्या. त्यांच्या तमाशाच्या खेळांना प्रेक्षकांची तोबा गर्दी व्हायची. किंबहुना पोटात बाळ असताना सुद्धा त्या मंचावर आपल नृत्य सादर करायचा. एकदा असच प्रसूतीची वेळ झाली पण तरीही त्या नाचत होत्या. जेव्हा त्यांना समजलं आता कधीही आपल्याला बाळ होऊ शकतं तेव्हा त्या मंचाच्या पाठी गेल्या आणि बाळाला जन्म देऊन त्याची नाळ दगडाने ठेचून पुन्हा एकदा आपल्या कर्तव्याला पूर्ण करायला गेल्या म्हणजेच बाळाला जन्म दिल्यावर लगेचच त्या रंगमंचावर तमाशा सादर करण्यासाठी गेल्या. त्यांची ही प्रेरणादायी कहानी आता श्रद्धा कपूर द्वारे पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

