Headlines

Tanvi Thakkar Aditya Kapadia Announce Divorce After 5 years Of Wedding ; Tanvi Thakkar Divorce : लोकप्रिय अभिनेत्री तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया यांचा घटस्फोट, साखरपुड्यानंतर 7 वर्षांनी लग्न, मग 5 वर्षांनी काडीमोड!


Tv Actress Announce Divorce : अभिनेत्री तन्वी ठक्कर हिने नवऱ्यापासून घटस्फोट घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

tanvi thakkar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
‘घुम है किसी के प्यार या स्टार प्लसवरील मालिकेत पाहायला मिळाली अभिनेत्री तन्वी ठक्कर हिचा तिचा नवरा आदित्य कपाडिया सोबत लग्नाच्या पाच वर्षांनंतर घटस्फोट होत आहे. नुकतेच या दोघांनी विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे. तन्वीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही बातमी दिली. तिने एक सविस्तर पोस्ट शेअर करुन या निर्णयाला त्यांच्या आयुष्यातील सर्वात भावनिक निर्णयांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. आपल्या निवेदनात तिने नमूद केले की, तिने आणि आदित्यने एकमेकांचा आणि आपापल्या कुटुंबांचा आदर राखून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

तन्वीने लिहिले, “गेल्या काही महिन्यांत अनेक लोकांनी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि प्रश्न विचारले. खूप विचार केल्यानंतर, आदित्य आणि मी आता स्वतंत्र मार्गांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आमच्या दोघांसाठीही अत्यंत भावनिक आहे; आम्ही एकमेकांचा आणि आमच्या कुटुंबांचा आदर व विचार करून अत्यंत काळजीपूर्वक हा निर्णय घेतला आहे.”

Maharashtra TimesAamir Khan Wedding Updates : लगीन घटिका समीप आली करा हो लगीन घाई! मुसळधार पावसातही आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची जय्यत तयारी, बहिणी व नातेवाईकांची लगबग सुरू

तन्वी ठक्करची घटस्फोटाची घोषणा

अभिनेत्रीने स्पष्ट केले की हा निर्णय परस्पर संमतीने घेण्यात आला आहे. शिवाय त्यांच्यात कोणताही कटुता नाही. ती म्हणाली, “यात कोणतीही नकारात्मकता किंवा अनावश्यक गोंधळ नाही; केवळ शांतता आणि संबंधित सर्वांसाठी चांगल्या भविष्याची विचार आहे. या काळात, मी प्रसारमाध्यमे, इंडस्ट्रीतील मित्र आणि हितचिंतकांना विनंती करते की त्यांनी आमच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि आम्हाला आवश्यक ती मोकळीक द्यावी. या विषयाबाबतच्या कोणत्याही फोन कॉलला किंवा प्रश्नांना मी प्रतिसाद देणार नाही. तुमच्या समजूतदारपणाबद्दल, प्रेमळपणासाठी आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद.”

Maharashtra TimesDevendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेटफ्लिक्सवर पाहतायत द ब्लॅकलिस्ट सीरिज, टेलिव्हिजनवरील रिअ‍ॅलिटी शोचेही मोठे चाहते

तन्वी आणि आदित्य यांचे लग्न

हे जोडपे पहिल्यांदा ‘एक दूसरे से करते हैं प्यार हम’ या टीव्ही शोच्या सेटवर भेटले. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर, त्यांनी 2013 मध्ये साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. साखरपुड्यानंतर सात वर्षांनी, 2021 मध्ये त्यांनी लग्न केले. तन्वी आणि आदित्य यांनी 16 फेब्रुवारी 2021 रोजी कोर्ट मॅरेज केले आणि त्यानंतर घरीच एक छोटासा समारंभ आयोजित केला होता. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांना मुलगा झाला.

Smita Tambe : सिनेमा, मातृभाषेवरचं प्रेम ते लेकीला दिलेली शिकवण, स्मिता तांबेसोबत खास गप्पा

तन्वी आणि आदित्य यांचे शो

कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, तन्वी ‘बहू हमारी रजनी कांत’ आणि ‘गुम है किसीके प्यार में’ सारख्या शोमध्ये दिसली आहे, तर आदित्यने ‘जस्ट मोहब्बत’, ‘शाका लाका बूम बूम’ आणि ‘एक दूसरे से करते हैं प्यार हम’ मध्ये काम केले आहे. त्याने ‘कोड रेड’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं’ सारख्या प्रोजेक्ट्सवरही काम केले आहे. आदित्यने हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्येही काम केले आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा