Headlines

Donald Trump Invites Teen Lifeguard to White House After Heroic Ocean Rescue | १० वर्षांच्या चिमुकल्याचे प्राण वाचवले, सांताक्रूझ बीचवरील १६ वर्षांच्या मुलाचं शौर्य जगभर चर्चेत, डोनाल्ड ट्रम्प देणार शौर्य पुरस्कार


Viral Rescue Video: एका १६ वर्षांच्या मुलाने समुद्रात बुडणाऱ्या १० वर्षांच्या मुलाचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्या मुलाचं कौतुक केलं असून, त्याला शौर्य पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.

Donald Trump invites teen hero to White House
(फोटो सौजन्य – @EricTrump/x.com)
समुद्राचं पाणी कधीही वाढू शकतं, त्यामुळे पोहताना सावध राहा, असा सल्ला वारंवार दिला जातो. पण काही लोक उत्साहाच्या भरात हळूहळू खूप पुढे जातात. त्यानंतर अचानक पाण्याची पातळी वाढते आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अशाच एका समुद्रात बुडणाऱ्या १० वर्षांच्या मुलाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे, एका १६ वर्षांच्या मुलाने स्वतःचा जीव धोक्यात घालून या चिमुकल्याचा जीव वाचवला. हा व्हिडीओ पाहून खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही भावूक झाले. त्यांनी स्वतः हा व्हिडीओ शेअर करत मुलाचं कौतुक केलं आणि त्याला भेटण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये बोलावलं. या मुलाचं धाडस सध्या संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरलं आहे.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

ही घटना अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सांता क्रूज येथील सीब्राइट बीचवर घडली. समुद्राचं पाणी अचानक वाढलं आणि प्रचंड लाटांमध्ये १० वर्षांचा मुलगा आत ओढला जात होता. मात्र, समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित असलेल्या १६ वर्षांच्या लाइफगार्डने क्षणाचाही विलंब न करता समुद्रात उडी मारली आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला वाचवलं. या मुलाच्या शौर्याला खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी सलाम केला. ते म्हणाले, “या धाडसी तरुणाला, त्याच्या कुटुंबाला आणि त्याने ज्याचा जीव वाचवला त्या मुलालाही आम्ही व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित करू. त्याला मोठा नागरी सन्मान देण्यात येईल. तो अत्यंत शूर आहे आणि या सन्मानाचा खरा हक्कदार आहे.”

मुलाच्या शौर्याचं होतंय कौतुक

डोनाल्ड ट्रम्प यांनी हा व्हिडीओ आपल्या @realDonaldTrump या X अकाउंटवरून शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ २ कोटी ६९ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच, अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत मुलाच्या धाडसाचं भरभरून कौतुक केलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बचाव करण्यात आलेल्या १० वर्षांच्या मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, सुदैवाने त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही आणि तो पूर्णपणे सुरक्षित आहे. मृत्यूच्या दाढेतून परतल्यामुळे तो काहीसा घाबरला असून, त्याची भीती दूर करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने समुपदेशन सुरू आहे.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा