Headlines

Disabled elder Cajetan Pires pushed off moving Mumbai local over seat between Bandra Mahim dies Crime News; धावत्या मुंबई लोकलमधून ढकललं, दिव्यांग वृद्धाचा मृत्यू; कावळा हुसकवताना चुकून धक्का, आरोपी सहप्रवाशाचा बनाव


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : उपनगरी रेल्वे प्रवासात सहप्रवाशाने धावत्या लोकलमधून ढकलल्याने एका ६४ वर्षीय दिव्यांग प्रवाशाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. कॅजेटन पिरिस असे या मृत प्रवाशाचे नाव आहे. कावळ्याला हुसकावताना पिरिस यांना चुकून धक्का लागला आणि ते लोकलमधून खाली पडले, असा बनाव आरोपीने करण्याचा प्रयत्न केला.

धावत्या लोकलमधून ढकललं

मुंबई लोकलमध्ये वांद्रे-माहीमदरम्यान गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास झालेल्या किरकोळ वादानंतर पिरिस यांना धावत्या लोकलमधून ढकलण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांनी अमजद शेख या प्रवाशाला अटक केली.

Maharashtra TimesNashik Crime : नाशिकमधील 34 वर्षीय विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वळण, दोन वर्षांचे प्रेमसंबंध, रिसॉर्टवर 43 वर्षीय प्रियकराने जीव घेतला

सहप्रवाशाशी वाद

सांताक्रूझ पूर्वेत राहणाऱ्या कॅजेटन पिरीस यांनी गुरुवारी चर्चगेट-बोरिवली लोकल पकडली. ते दिव्यांगांसाठीच्या डब्यातून प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान सहप्रवासी अमजद शेख याच्याशी त्यांचा वाद झाला. वाद वाढत गेल्याने शेखने पिरिस यांना धावत्या लोकलमधून धक्का दिला. यामुळे ते डब्याबाहेर फेकले गेले.

रुळांवर पडले, मृत घोषित

या घटनेची माहिती रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाला मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पिरिस हे रुळांवर पडलेले आढळले. पोलिसांनी त्यांना तातडीने भाभा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Maharashtra TimesPune Crime : सायकलवरुन जाणारा कोण आहे? CCTV पाहून पोलिसांचा सवाल; साहेब हा तर मीच आहे, आरोपीचं उत्तर, पुण्यातील चिमुकलीवर अत्याचार करणारा अलगद सापडलादरम्यान या प्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांनी अमजद शेखला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी चर्चगेटजवळील दर्ग्याच्या परिसरातील फुटपाथवर राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

अविवाहित असलेले कॅजेटन पिरीस हे सांताक्रूझ येथे राहत होते. जवळपास दोन दशकांपूर्वी झालेल्या एका भीषण अपघातात त्यांना एक पाय गमवावा लागला होता.

Maharashtra TimesKolkata Fire : मोठ्या मुलीला घरी ठेवलं; पत्नी, मुलगा, सासऱ्यांसह लॉजवर राहिले, काळरात्री घात झाला, टीव्ही पत्रकाराचा कुटुंबासह अंत

आरोपीकडून बचावाचा प्रयत्न

‘मी त्यावेळी अस्वस्थ होतो व कावळ्याला हुसकावताना पिरिस यांना चुकून धक्का लागला आणि ते लोकलमधून खाली पडले’, असा दावा आरोपीने केला आहे. आरोपीचा दावा, साक्षीदारांची माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे घटनेचा नेमका क्रम तपासण्यात येत आहे. वादाचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी रेल्वे पोलिसाकडून तपास सुरू आहे.

लोकलमध्ये दागिने चोरणाऱ्या महिलेला बेड्या

दुसरीकडे, गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या २१ वर्षीय महिलेला ठाणे रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध घेत पोलिसांनी तिच्याकडून तीन चोरीच्या घटनांतील तीन लाख ४३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. प्रियंका आहिरे असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

१७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २वर एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरीला गेली. अंबरनाथ लोकलच्या सीएसएमटीकडील महिला डब्यात चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन ही चोरी करण्यात आली. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Maharashtra TimesNagpur News : तरुण मुलगा अपघातात ब्रेन डेड, कुटुंबावर शोककळा, दुःखद प्रसंगातही धीरोदात्त निर्णय, चौघांना नवं जीवनतपासादरम्यान पोलिसांनी स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. गर्दीत महिला डब्याजवळ वावरणाऱ्या एका संशयित महिलेच्या हालचाली पोलिसांच्या लक्षात आल्या. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी प्रियंका हिला ताब्यात घेतले.

चौकशीत तिचा चोरीच्या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे समोर आले. तिच्याकडील दागिन्यांची माहिती घेतल्यानंतर ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात यापूर्वी दाखल असलेल्या आणखी दोन चोरीच्या गुन्ह्यांचाही उलगडा झाला.

पोलिसांनी ५.३९० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, १०.८७० ग्रॅम वजनाची माळ आणि ७.०१० ग्रॅम वजनाची सोनसाखळी हे दागिने या महिलेकडून जप्त केले आहेत.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत