Headlines

Dhule Shirpur Phata Innova Car Truck Accident Two Died on the Spot; देवदर्शनाहून येताना चालकाचं नियंत्रण सुटलं, कार दुभाजक तोडून ट्रकला धडकली; भीषण अपघातात दोघांचा करुन अंत


Dhule Car Accident : धुळे जिल्ह्यातील शिरपूर फाट्याजवळ इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोनजणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झालेला आहे.

Dhule Shirpur Phata Innova car accident
धुळे शिरपूर फाटा इनोव्हा कार अपघात(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अजय गर्द, धुळे : अजमेर येथे देवदर्शन आटोपून नाशिककडे परतीच्या प्रवासात असलेल्या भाविकांच्या इनोव्हा कारला धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूर फाटा मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अत्यंत भीषण अपघात झाला आहे. शिरपूर फाट्याजवळ घडलेल्या या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या दुर्घटनेत कारमधील दोन जणांचा जागीच करुण अंत झाला असून, अन्य पाच जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

इनोव्हा कारचा अक्षरशः चक्काचूर

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा कारवरील चालकाचं अचानक नियंत्रण सुटलं. अनियंत्रित झालेली ही कार वेगाच्याभरात थेट महामार्गावरील दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर घुसली आणि समोरून येणाऱ्या एका मालवाहू ट्रकला अत्यंत वेगाने जाऊन धडकली. ही धडक इतकी भयंकर होती की यात इनोव्हा कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
Maharashtra TimesCoastal Road Fire : हॉर्न वाजवून लक्ष वेधलं, दोन कार चालकांची समयसूचकता, कोस्टल रोड बोगद्यात गाडी पेटण्यापूर्वी कुटुंबाची थरारक सुटका
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले. सर्व जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
देवदर्शनासाठी गेलेल्या नाशिकमधील या कुटुंबावर वाटेतच काळाने असा भयंकर घाला घातल्यानं सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून, या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

पुण्याकडे निघालेल्या दोन तरुणांचा वेगाने केला घात

छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर गंगापूरजवळ एका भीषण आणि अत्यंत दुःखद अपघातात जालन्यातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. समोर धावणाऱ्या आयशर ट्रकला पाठीमागून भरधाव दुचाकीने जोरात धडक दिल्याने हा थरकाप उडवणारा अपघात घडला. ही दुर्दैवी घटना गंगापूर तालुक्यातील भेंडाळा गावाजवळ रॉयल पॅलेस हॉटेलसमोर घडली. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. रितेश राजेश राठोड (वय २३) आणि अविनाश केशव चव्हाण (वय २४, रा. मंठा जि. जालना) असे मयत झालेल्या तरुणांचं नाव आहे.
Maharashtra TimesAbhijeet Dipke: त्यांना मूलबाळ नाही म्हणून जनतेशी काही देणंघेणं नाही; म्हणालो होतो भारतात येऊ नकोस! अभिजीत दिपकेचे आई-वडील संतापले
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, रितेश राठोड आणि अविनाश चव्हाण हे दोघे दुचाकीवरून मंठा जि. जालना तालुक्यातून पुण्याकडे निघाले होते. ते दुचाकीने जालन्याहून पुण्याला जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. भेंडाळा गावाजवळ रॉयल पॅलेस हॉटेलसमोर पोहोचताच, महामार्गावरून समोर धावणाऱ्या एका आयशर ट्रकला त्यांच्या भरधाव दुचाकीने पाठीमागून भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, दुचाकीवरील दोन्ही तरुण जागेवरच कोसळले. अपघाताची माहिती मिळताच गंगापूर येथील रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे आणि अनिकेत मुळक यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने घटनास्थळ गाठले आणि दोन्ही जखमींना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉ. विजय केंद्रे यांनी तपासाअंती दोघांनाही मृत घोषित केले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा