Headlines

Dhule Gurudwara during Guru Gobind Singh Jayanti by Baba Ranbir Singh and his Associates Stone Pelting; ‘प्रमुखांचे आदेश आहेत, तुम्हाला…’; गुरू गोविंदसिंग जयंतीला गालबोट; रणबीरसिंगविरोधात गुन्हा


Dhule Gurdwara Stone Pelting : गुरुद्वाराचे स्वघोषित प्रमुख रणबीरसिंग यांनी व सहकाऱ्यांनी रविवारी रात्री आलेल्या भाविकांवर तुफान दगडफेक केली, तलवारी, लाठ्या-काठ्यांचा वापर करण्यात आला, वायूही सोडण्यात आला. या प्रकरणी रणबीरसिंग यांच्यासह जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करून, 12 जणांना ताब्यात घेतले.

Dhule Gurdwara Stone Pelting
धुळे गुरू गोविंदसिंग जयंती दगडफेक(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, धुळे : शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरुद्वारा येथे गुरू गोविंदसिंग जयंतीच्या पूर्वसंध्येला गालबोट लागले. गुरुद्वाराचे स्वयंघोषित प्रमुख बाबा रणबीरसिंग यांनी गुरुद्वाराच्या गेटला कुलूप लावत भाविकांना आत येण्यास मज्जाव केल्याने समस्त शीख समुदायासह भाविकांमध्ये संतप्त वातावरण होते. त्यातच रविवारी दि. 4 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास प्रकाशपर्वाची तयारी करण्यासाठी गुरुद्वारात आलेल्या भाविकांवर बाबा रणबीरसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी तुफान दगडफेक केली.

रणबीरसिंग यांच्यासह जमावाविरूद्ध गुन्हा

यावेळी तलवारी, लाठ्या-काठ्यांचा सर्रास वापर करण्यात आला. शिवाय भाविकांना पळवून लावण्यासाठी फायर एक्सटिंग्यूशर गॅस सोडण्यात आला. या घटनेत अनेक भाविक जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. याप्रकरणी शहर पोलिसांत रणबीरसिंग यांच्यासह जमावाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी 12 जणांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, गुरुद्वारा परिसरात सध्या पोलिसांचा फौजफाटा तैनात असून तणावपूर्ण शांतता आहे.
Maharashtra TimesWeather News : उष्ण वातावरणात मान्सून कमकुवत होण्याची शक्यता; पाऊस, शेती आणि पाण्याच्या उपलब्धतेवर थेट परिणाम

‘रणबीरसिंगचा आदेश आहे’

गुरुद्वाराचे मुख्य प्रबंधक बाबा धीरजसिंग पुरणसिंग खालसा यांच्या हत्येनंतर रणबीरसिंग यांनी गुरुद्वाराची धार्मिक गादी ताब्यात घेतली आहे. शहरातील शिख बांधवांनी त्यास विरोध केला असता धमक्या दिल्या जात होत्या. त्यामुळे शिख बांधवांनी अदखलपात्र तक्रारी दाखल केल्या आहेत. रणबीरसिंगने गुरुद्वाराचे मुख्यद्वार बंद करून प्रार्थनेस बंदी घातली होती. रविवारी दि.4 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास कीर्तन व लंगरच्या तयारीसाठी संगत गुरुद्वाराचे रणबीरसिंगच्या आदेशाने द्वार बंद ठेवण्यात आले. याप्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात रणबीरसिंग सुखदेवसिंग खालसा आदींवर गुन्हा दाखल केला आहे. रात्री 10 वाजता हरजिंदरसिंग काबडवाल, मनजितसिंग बंगे, मनदीपसिंग सैनी, सतनामसिंग परमार, भुपेंद्रसिंग पांडे व इतर 30-35 भाविक पुन्हा गुरुद्वारात गेले. त्यावेळी गेट उघडण्याची शीख बांधवांनी विनंती केली, तेव्हा आतील 5-6 जणांनी ‘रणबीरसिंगचा आदेश आहे, तुम्हाला जिवंत सोडणार नाही’, असं म्हणत शिवीगाळ व मारहाण केली.

याप्रकरणी मुख्य सूत्रधार रणबिरसिंग सुखदेवसिंग खालसा, त्यांचे सहकारी दर्शनसिंग सुखदेवसिंग खालसा (शालक), जगबिंदरसिंग हरप्रीतसिंग संद, दलेरसिंग मिरसिंग (रा.अमृतसर), लालसिंग सिंगारामसिंग (रा.अमृतसर), सुदेशसिंग बचनलाल उर्फ बच्चनसिंग (रा.गुरुदासपुर), दारासिंग मखनसिंग (रा.अमृतसर), कर्तारसिंग जागरसिंग सिख (रा.शिवपुरी, मध्य प्रदेश), शविंदरसिंग रजवंतसिंग (रा.अमृतसर), गुरु प्रीतसिंग बसंतसिंग (रा.गुरुद्वारा, धुळे), संदीपसिंग भवरलाल (रा.राजस्थान), गुरिंदरसिंग लखबबीरसिंग (पंजाब) यांच्यासह 10 ते 15 जणांविरुध्द गुन्हा दाखल करून 12 संशयितांना अटक केली.
Maharashtra TimesBhusawal-Chittorgarh Highway: जळगावमध्ये बनतोय आणखी एक राष्ट्रीय महामार्ग; राजस्थान, मध्य प्रदेशमधून थेट… कसा असेल नवा मार्ग?

जीवे मारण्याची धमकी

गुरुद्वाराला कुलूप लावण्याप्रकरणी पोलिसांनी रणबीरसिंग यांना दोनवेळा बोलवून समज दिली होती. त्यानंतरही त्यांनी कुलूप उघडले नाही. रविवारी दुपारच्या सुमारास पंजाब येथील भाविक भुपेंद्रसिंग किसनसिंग (वय 66) हे गुरुद्वारात आले असता त्यांना प्रवेश नाकरण्यात आला. तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे त्यांनी शहर पोलिसांत धाव घेत रणबीरसिंग सुखदेवसिंग खालसा, दलेरसिंग निहंग (रा.अमृतसर) व जगविंदरसिंग हरप्रीतसिंग (रा.पंजाब) या तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर रात्री दहा वाजता भाविकांना पुन्हा प्रवेश नाकारून दगडफेक व तलवार, लाठ्या-काठ्यांसह हल्ला करण्यात आला.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा