Headlines

Dharashiv mla kailas patil on omraje nimbalkar rebellion and shivsena uddhav thackeray; अनेकांनी साथ सोडली, मार्ग बदलला, पण…; ओमराजेंच्या बंडानंतर कैलास पाटलांनी जाहीर केली पुढील दिशा


धाराशिव: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काल बोलावलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहून ओमराजे निंबाळकर यांच्यासह इतर पाच खासदारांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. व्हिप जारी केल्यानंतरही हे सहा खासदार बैठकीला अनुपस्थित राहिल्याने त्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील प्रवेश निश्चित मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि इतर पदाधिकारी काय भूमिका घेणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. अशातच आज शिवसेनेच्या वर्धापनदिनीच धाराशिव जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि ओमराजे निंबाळकरांचे अत्यंत जवळचे मित्र कैलास पाटील यांनी आपली राजकीय दिशा स्पष्ट केली आहे.

ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराबाबत संदिग्दधा असून ही अफवा ठरवा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकसंध राहावा, अशी इच्छा नुकतीच आमदार कैलास पाटील यांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली होती. त्यानंतर आज शिवसेनेच्या वर्धापनदिनी पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सूचक पोस्ट लिहिली असून ठाकरेंसोबतच राहण्याचे संकेत दिले आहेत.

कैलास पाटील यांनी म्हटलंय की, “शिवसेना ही केवळ नेत्यांची संघटना नाही; ती विचारांची, निष्ठेची आणि जनतेच्या विश्वासाची चळवळ आहे. हे नातं सत्तेचं नाही, तर विश्वासाचं आहे; पदाचं नाही, तर निष्ठेचं आहे. म्हणूनच अनेकांनी साथ सोडली, अनेकांनी मार्ग बदलला, तरी प्रत्येक संकटात शिवसैनिक मशाल हाती घेऊन खंबीरपणे उभा राहिला आणि शिवसेनेचा भगवा झेंडा अभिमानाने फडकवत राहिला आहे,” असं म्हणत आमदार पाटील यांनी यापुढेही आपण मशालीसोबत राहणार असल्याचं सुचवलं आहे.

नेमकं काय म्हणाले कैलास पाटील?

शिवसेनेच्या वर्धापनदिनी शिवसैनिकांना शुभेच्छा देताना कैलास पाटील म्हणाले की, “हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पेटवलेली शिवसेनेची मशाल आज ६० वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण करत आहे. मराठी माणसाच्या हक्कांसाठी, अन्यायाविरुद्धच्या लढ्यासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी पेटलेली ही मशाल आजही तितक्याच तेजाने प्रज्वलित आहे. शिवसेनेच्या या ६० वर्षांच्या वाटचालीत असंख्य शिवसैनिकांनी दिलेला त्याग, केलेला संघर्ष आणि जपलेली निष्ठा हेच पक्षाचे खरे सामर्थ्य आहे.शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त सर्व निष्ठावान आणि कट्टर शिवसैनिकांना मनःपूर्वक शुभेच्छा,” अशा शब्दांत पाटील यांनी शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत