नागपूर : ‘ऑपरेशन टायगर’ नंतर राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले आहेत. ईशान्य मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याच्या आणि बॉम्ब टाकण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप राऊत यांनी आपल्या पत्रात केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद फडणवीस म्हणाले की, कोणाचेही घर आम्ही बॉम्बने उडवू देणार नाही आणि पोकळ धमक्यांना कोणीही घाबरू नये. कोणी धमक्या देत असेल तर त्यावर पोलिस योग्य कारवाई करतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय दिना पाटलांना सुनावलं आहे.
संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून फुटलेले सहा खासदार जनतेच्या रोषाला सामोरे जात असून त्यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन होत आहेत. आंदोलन करणे आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार असल्याचे नमूद करत त्यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर आंदोलनकर्त्यांना धमकावल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर इथं बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, नागपूर विमानतळाच्या हस्तांतरण प्रक्रियेबाबतही मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. नागपूर विमानतळाचे अधिकृत हस्तांतरण जीएमआर समूहाकडे करण्यात आल्याने शहराच्या विकासाला नवे पंख मिळणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि न्यायालयीन अडथळे दूर झाल्यानंतर हा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण होईल, तसेच नागपूर विमानतळाच्या ग्राउंड फील्ड प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचा विमानतळ उभारला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्यामुळे महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव मंजूर झाला. जीएमआरच्या माध्यमातून नागपूरला आधुनिक विमानतळ मिळणार आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नागपूरला देशातील प्रमुख कार्गो हब बनविण्याचे स्वप्न अनेक वर्षांपासून पाहिले जात होते. मात्र विमानतळ विकास हा त्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक होता. आता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने कार्गो हब प्रकल्पाला वेग मिळेल. भविष्यात नागपूर मध्य भारतातील सर्वात महत्त्वाचे विमानतळ केंद्र म्हणून उदयास येईल आणि शेतकरी, उद्योग, व्यापारी तसेच संपूर्ण विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा