Cockroach Janata Party Founder Abhijeet Deepke Explanation on Education Funding in America to RTI Activist Amit Tiwari; वडिलांना 60 हजार पगार, अमेरिकेत मुलाच्या शिक्षणासाठी खर्च कसा केला?’ RTI कार्यकर्त्याच्या प्रश्नावर अभिजीत दिपकेंचा मोठा खुलासा
Cockroach Janata Party Founder Abhijeet Deepke Explanation on Education Funding in America to RTI Activist Amit Tiwari; वडिलांना 60 हजार पगार, अमेरिकेत मुलाच्या शिक्षणासाठी खर्च कसा केला?’ RTI कार्यकर्त्याच्या प्रश्नावर अभिजीत दिपकेंचा मोठा खुलासा
Abhijeet Dipke Clarified US Education Funding : कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी त्यांच्या अमेरिकेतील शिक्षणाचा खर्च कसं केला? त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
अभिजीत दिपके अमेरिका शिक्षण शिष्यवृत्ती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक आणि नवी दिल्लीतील आंदोलनाचे सूत्रधार अभिजित दिपके यांच्या कौटुंबिक आर्थिक परिस्थितीवरून आणि पक्षाच्या फंडिंगवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अभिजित दिपके यांच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी एका माहिती अधिकार कार्यकर्त्यानं केली असून, यावर चौकशी होईल न होईल परंतू अभिजित दिपके यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमधील आपल्या उच्च शिक्षणाचा खर्च शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जातून पूर्ण झाल्याचं दिपके यांनी स्पष्ट केलं आहे.
आरटीआय कार्यकर्त्याचा प्रश्न काय?
सुरत येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अमित तिवारी यांनी 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र सरकारसह विविध प्रशासकीय विभागांकडे तक्रार दाखल केली आहे. अभिजित दिपके यांचे वडील भगवानराव दिपके हे MIDC मधून ज्युनिअर इंजिनिअर पदावरून निवृत्त झाले आहेत. ‘महिन्याला अवघा 60 ते 65 हजार रुपये पगार घेणारा एक मध्यमवर्गीय सरकारी कर्मचारी आपल्या मुलाला उच्च शिक्षणासाठी थेट अमेरिकेसारख्या महागड्या देशात कसा काय पाठवू शकतो?, असा सवाल त्यांनी केला होता. यावर अभिजित दिपके यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.
ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘मी अमेरिकेतील शिक्षणाचा खर्च कसा केला? याची अनेकांना उत्सुकता आहे. माझ्या बोस्टन युनिव्हर्सिटीतील शिक्षणाचा मोठा खर्च मला मिळालेल्या स्कॉलरशिपमुळे भागला. उर्वरित खर्चासाठी मी बँक एज्युकेशन लोन घेतलं होतं, जे मला आता फेडायचं आहे,’ असं दिपके यावेळी म्हणाले. पक्षाच्या भवितव्यातील फंडिंगबाबत बोलताना त्यांनी सांगितलं केलं की, ‘सीजेपीचे काम क्राउडफंडिंगद्वारे चालेल आणि लोकांकडून मिळणाऱ्या प्रत्येक रुपयाचा पारदर्शक हिशोब ठेवला जाईल’. जंतर-मंतरवरील आंदोलनाचा उल्लेख करताना दिपके यांनी दावा केला की, ‘काही दिल्ली पोलीस कर्मचाऱ्यांनी गुप्तपणे आम्हाला पाण्याच्या बाटल्या आणि मदत दिली. ‘आमची मुलेही नीट परीक्षेची तयारी करत आहेत, त्यामुळे आमचा तुम्हाला पाठिंबा आहे’, असं त्यांनी आम्हाला त्यावेळी सांगितलं होतं.’
दरम्यान, तिवारी यांनी निवडणूक आयोग आणि केंद्रीय जीएसटी विभागाकडे धाव घेत सीजेपीच्या कायदेशीर निधीची चौकशी करण्याची विनंती केली आहे. ‘काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी नीट पेपरफुटी आंदोलनात दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या आंदोलकांना कायदेशीर मदत देण्यासाठी 1 कोटी रुपयांच्या लीगल प्रोटेक्शन फंडची घोषणा केली होती. ‘कॉकरोच जनता पार्टी’ ही लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951च्या कलम 29अ अंतर्गत निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे की नाही, याची चौकशी व्हावी. अनोंदणीकृत संघटना राजकीय पक्षासारखे काम करत असताना 1 कोटी रुपयांची देणगी कशी काय जाहीर केली जाऊ शकते? या आर्थिक व्यवहारांची जीएसटी आणि निवडणूक आयोगाने चौकशी करावी’, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी केली आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा