Clash between congress and abvp workers in pune case filed against 60 workers; पुण्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधीच तुफान राडा; काँग्रेसच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
Clash between congress and abvp workers in pune case filed against 60 workers; पुण्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधीच तुफान राडा; काँग्रेसच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
पुणे: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थी मेळाव्याच्या पूर्वसंध्येला पुण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले. COEP कॉलेजच्या हॉस्टेल परिसरात शुक्रवारी मध्यरात्री काँग्रेसची विद्यार्थी आघाडी NSUI आणि भाजप प्रणित ABVP यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी सौम्य लाठीमार सुद्धा केला. पुण्यात आयोजित विद्यार्थी संवाद सभेसाठी NSUI चे पदाधिकारी महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संपर्क साधत होते. या मोहिमेदरम्यान COEP वसतिगृहाजवळ दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला.
राहुल गांधी यांच्या कार्यक्रमास पाठिंबा देणाऱ्या दोन विद्यार्थिनींना ABVP च्या कार्यकर्त्यांनी खोलीत डांबून दमदाटी केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. या विद्यार्थिनींच्या मदतीसाठी गेलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला. तर दुसरीकडे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींवर राहुल गांधी यांच्या सभेसाठी नोंदणी करण्यासाठी आणि उपस्थित राहण्यासाठी काँग्रेस व एनएसयूआयचे कार्यकर्ते बळजबरीने दबाव टाकत असल्याचा पलटवार ABVP ने केला आहे.
या राड्याची माहिती मिळताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, प्रशांत जगताप यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मध्यरात्रीच महाविद्यालय परिसरात धाव घेतली. पोलिसांच्या लाठीमाराचा निषेध करत कार्यकर्त्यांनी कॅम्पसमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले.
अभाविप कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एनएसयूआय व युवक काँग्रेसच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पुष्कर आबनावे, भूषण रानभरे, अक्षय जैन, सौरव आमराळे, सागर धाडवे, प्रथमेश आबनावे यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. शिवाजीनगर पोलिसांनी संबंधित काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), १८९ (१), १८९ (२), १९१ (२), ३५१ (१), ३५२ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७ (३) आणि १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
दरम्यान, पुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीओईपी कॅम्पस व वसतिगृह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा