Headlines

CJP Protest Delhi: सख्खा भाऊ गेलाय, आम्हाला न्याय हवा…! नाशिकच्या तरुणाची व्यथा; मोर्चासाठी गाठली दिल्ली – nashik elder broter joins delhi protest seeking justice for sibling who ends life after neet paper leak


​​CJP Protest Delhi: ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी अनिकेतला १ जुलै रोजी फोन केला आणि दिल्लीत आंदोलनात सहभागी होण्यासाठी बोलावले. त्यानुसार गोसावी कुटुंब दिल्लीत गेले आहे.

cjp protest delhi
दिल्ली आंदोलन(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: ‘नीट’चा पेपर चांगला गेल्यावर ‘तो’ खूप खूश होता; पण पेपरफुटीची बातमी ऐकल्यावर नैराश्यात गेला… तो उच्च रक्तदाबाच्या गोळ्या घेऊ लागला. सोळा-सोळा तास अभ्यास करू लागला. या नैराश्यातच बरोबर एका महिन्यापूर्वी त्याने आत्महत्या केली…’

नाशिकच्या अनिकेत गोसावी या तरुणाची ही कहाणी ऐकून कोणाही संवेदनशील व्यक्तीचे डोळे पाणावतील. ‘नीट’ परीक्षेच्या गोंधळामुळे सख्खा भाऊ गमावल्याची वेदना पाणावलेल्या डोळ्यांनी सांगणाऱ्या अनिकेतचे रील्स, बातम्या सोमवारच्या (दि. २०) दिल्लीतील ‘सीजेपी’च्या आंदोलनानंतर व्हायरल झाल्या व नाशिककर हेलावले. नाशिकमधील गोसावी कुटुंब ‘सीजेपी’च्या आंदोलनात सहभागी झाले आहे.

Maharashtra TimesAditya Thackeray: फेसलेस आंदोलनामुळेच भाजपच्या तोंडाला फेस; आदित्य ठाकरेंचा CM फडणवीसांवर पलटवार, मारहाण केलेल्या आंदोलकांना आवाहन
अनिकेतचा भाऊ यश याने गेल्या वर्षी नीट परीक्षा दिली. मात्र, अवघ्या दोन गुणांनी त्याचा ‘एमबीबीएस’चा प्रवेश हुकला. त्याने दिवसरात्र अभ्यास करून यावर्षी पुन्हा परीक्षा दिली. त्याला ५५० गुण मिळाल्याचे कळले. वैद्यकीय प्रवेश निश्चित झाल्याने तो आनंदी होता. मात्र, तेवढ्यात पेपरफुटीची बातमी आली. त्यानंतर तो प्रचंड नैराश्यात गेला. घरच्यांसोबत फार बोलेनासा झाला. सोळा-सोळा तास अभ्यास करू लागला. रक्तदाब वाढू लागल्याने त्याला गोळ्या घ्याव्या लागल्या. अशा स्थितीत त्याने गेल्या २१ जूनला आत्महत्या केली.

जंतरमंतर येथे दीपके यांनी या कुटुंबाला मंचावर बोलावून त्यांच्या व्यथेला वाट मोकळी करून दिली. ‘यशचा मृत्यू अतितणावामुळे झाला व हा तणाव ‘नीट’च्या गोंधळामुळे निर्माण झाला,’ असा दावा अनिकेतने तेथील काही माध्यमांशी बोलताना केला. त्याचे रील्स पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
Maharashtra TimesDevendra Fadnavis: राजकीय पोळी भाजताहेत! दिल्ली आंदोलनावरुन मुख्यमंत्र्यांचा आरोप; पोलिस योग्य असल्याचा दावा
‘ रात्र काढली जागून…’
नाशिक : ‘रविवारी रात्री केवळ जंतरमंतर परिसरात दहा हजार पोलिस व जवानांचा फौजफाटा तैनात होता. वांगचुक यांना सकाळी उचलून नेल्यानंतर रात्रीतूनच काही घडण्याची शक्यता होती. अश्रुधुराच्या नळकांड्या, पाण्याचे फवारे सज्ज होते. त्यामुळे आम्ही दहशतीत अख्खी रात्र जागून काढली,’ अशा शब्दांत नाशिकहून दिल्ली आंदोलनात सहभागी झालेल्या ‘एआयएसएफ’च्या कार्यकर्त्या सई अहिरे यांनी ‘मटा’कडे ‘आँखो देखा हाल’ मांडला.

अहिरे यांनी सांगितले, ‘रविवारी रात्री ११.३० ला जंतरमंतरवर पोहोचले, तेव्हा तेथे ६० ते ७० हजारांचा जमाव होता. पुढे ही संख्या वाढून लाखापर्यंत गेली. सकाळी मोर्चा सुरू होण्याआधीच पोलिसांनी बॅरिकेडिंग केले व मोर्चेकऱ्यांवर लाठीमार केल्याने चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. दुपारी बारापासून सायंकाळपर्यंत लाठीमार सुरू होता. चेंगराचेंगरी व लाठीमारात अनेक जण जखमी झाले. मोबाइल जॅमरमुळे कोणाशी संपर्क साधता येत नव्हता. बाहेरही पडता येत नव्हते. पोलिसांनी उपोषणाच्या ठिकाणी जाऊनही मारहाण केली.’

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा