Headlines

Chhatrapati Sambhajinagar Vaijapur Rat Droppings Found in Kachori from a Famous Sweet Shop; वडिलांनी नामांकित मिठाईच्या दुकानातून कचोरी आणली, उघडताच उंदराची विष्ठा; समजेपर्यंत लेकरांनी कचोरी खाऊनही टाकल्या


Chhatrapati Sambhajinagar Rat Droppings in Kachori : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मिठाईच्या दुकानातील कचोऱ्यांमध्ये उंदराची विष्ठा आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Rat Droppings in Kachori
छत्रपती संभाजीनगर वैजापूर कचोरीमध्ये उंदराची विष्ठा(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा एक अत्यंत किळसवाणा आणि संतापजनक प्रकार वैजापूर शहरात उघडकीस आला आहे. एका नामांकित मिठाईच्या दुकानातून खरेदी केलेल्या कचोऱ्यांमध्ये चक्क उंदराची विष्ठा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकाराची माहिती मिळण्यापूर्वीच घरातील लहान मुलांनी दोन कचोऱ्या खाल्ल्याचा गंभीर आरोप ग्राहकाने केला असून या निष्काळजीपणामुळे नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर शहरातील एका कचोरी सेंटरमधून एका ग्राहकाने पाच कचोऱ्या खरेदी करून घरी नेल्या होत्या. मात्र, घरी गेल्यावर जेव्हा त्यांनी खाण्यासाठी कचोरी फोडली, तेव्हा त्यात एक-दोन नव्हे, तर उंदराची विष्ठा आढळल्याचंदिसून आलं. एका कचोरीत हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी उर्वरित सर्व कचोऱ्या तपासून पाहिल्या असता, पाचही कचोऱ्यांमध्ये उंदराची विष्ठा आढळल्यानं ग्राहकाच्या पायाखालची जमीनच सरकली.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar: माझ्या मुलीत मला माझी आई दिसली; परभणीच्या रिक्षाचालकाने सजवला सोन्याचा महाल; लेकीच्या स्वागतामागची कहाणी वाचून डोळे पाणावतील

चिमुकल्यांचा जीव धोक्यात; अन्न औषध प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

कचोरी खाण्यापूर्वी ग्राहकाच्या लक्षात हा प्रकार येईपर्यंत दुर्दैवानेघरातील लहान मुलांनी दोन कचोऱ्या खाल्ल्या होत्या. या दूषित अन्नामुळे चिमुकल्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून पालकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. हॉटेल चालकांच्या अशा बेजबाबदार आणि अस्वच्छ कारभारामुळे ग्राहकांच्या जिवाशी थेट खेळ सुरू असल्याचं या घटनेवरून स्पष्ट झालं आहे. या धक्कादायक घटनेनंतर वैजापुरातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या ढिम्म कारभारावर नागरिक ताशेरे ओढत असून, संबंधित मिठाई विक्रेत्यावर आणि हॉटेल चालकावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

महावॉकेथॉनमध्ये मुदतबाह्य बिस्किटे

मृद व जलसंधारण विभागाच्या महावाॅकेथान रॅलीमध्ये विद्यार्थ्यांना मुदतबाह्य बिस्किटे वाटण्यात आली. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या नावाचे आणि प्रतिमेचे संयोजकांना विस्मरण झाल्याचे सांगण्यात आले. ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे सरचिटणीस उद्धव पवार यांनी या प्रकरणी आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.

Maharashtra TimesSolapur Crime : 42 वर्षीय विवाहितेचं 27 वर्षीय तरुणाशी इन्स्टावर सूत जमलं, मुलगा-नवऱ्याला सोडून आली, लग्नाचा तगादा, प्रियकराची दुर्दैवी अखेर
जलसंवर्धन दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि महापौर वंदना मगरे या सहभागी झाल्या होत्या. अन्य कोणतेही लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हते. समारोपानंतर उपस्थितांना बिस्किटे देण्यात आली त्यावर वापरण्याची अंतिम तारीख ‘मार्च २०२६’ होती, ही बिस्किटे पाच महिन्यांपूर्वीच मुदतबाह्य झालेली होती. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या समोर हा प्रकार घडला. मुदतबाह्य बिस्किटे असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी मान्य केले.