Headlines

Chhatrapati Sambhajinagar Uttam Uphar Gruha FDA Raid License Revoked Tukaram Mundhe; छ.संभाजीनगरमधील प्रसिद्ध ‘उत्तम उपहार गृह’वर FDAचा छापा, हॉटेलात पाय टाकताच नको ते दिसलं, तुकाराम मुंढेंचा आदेश अन् परवाना रद्द


Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगर शहरातील खवय्यांसाठी अत्यंत आवडते आणि विशेषतः चवदार इमरती, जिलेबी व समोशांसाठी प्रसिद्ध असलेल्या गुलमंडी परिसरातील मछलीखडक येथील ऐतिहासिक ‘उत्तम उपहारगृह’वर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Husband Killed in Hotel
संभाजीनगर उत्तम उपहार गृह छापा(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मिठाई उत्पादक आणि हॉटेल्सविरोधात राज्यभरात विशेष मोहीम तीव्र करण्यात आली आहे. याच मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती व गजबजलेल्या गुलमंडी परिसरातील मच्छली खडक येथील अतिशय जुने आणि प्रसिद्ध नाश्ता केंद्र तसेच मिठाई उत्पादक दुकान ‘उत्तम उपहार गृह’वर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकली. या पाहणीदरम्यान ग्राहकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असलेल्या तब्बल 10 गंभीर त्रुटी आढळून आल्या. यानंतर प्रशासनानं कडक पाऊल उचलत या आस्थापनेचा परवाना तातडीने निलंबित केला असून दुकान पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

तपासणीत उघड झालेला अस्वच्छता आणि भेसळीचा प्रकार

१. चुकीचा परवाना घेऊन उत्पादन: मिठाई, जिलेबी आणि इमरती तयार करण्यासाठी नियमानुसार ‘उत्पादक’ वर्गातील परवाना आवश्यक असताना, या आस्थापनेने केवळ ‘रेस्टॉरंट’ या चुकीच्या श्रेणीत परवाना मिळवला होता.

२. तळण्यासाठी अत्यंत विषारी तेलाचा वापर समोसे आणि भजी तळण्यासाठी वारंवार तेच तेल उकळले जात होते. या तेलाची चाचणी केली असता, त्याची गुणवत्ता अत्यंत खालावलेली आढळली. आरोग्यासाठी अपायकारक असणारे हे तेल वापरून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू होता. Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar: छत गळतंय, विद्यार्थी पाणी काढतायत; फुलंब्रीत ZP शाळेचं धक्कादायक वास्तव, शिक्षण विभागावर संताप
३. पुन्हा पुन्हा उकळलेले वनस्पती तूप: जिलेबी आणि इमरती तळण्यासाठी देखील निकृष्ट दर्जाचे आणि वारंवार वापरलेले वनस्पती तूप वापरले जात असल्याचे स्पष्ट झाले.

४. खाद्यपदार्थांच्या जागी झुरळांचा वावर: जिथे खाद्यपदार्थ बनवले जातात, तिथेच मोठ्या प्रमाणावर झुरळ फिरताना दिसले. विशेष म्हणजे, येथे कीटकनाशक फवारणी केल्याची कोणतीही नोंद आढळली नाही.

५. रंगांचा बेकायदेशीर वापर: जिलेबी आणि इतर मिठाईत आकर्षक दिसण्यासाठी कृत्रिम रंगांचा बेकायदेशीर आणि अमर्याद वापर केला जात होता. हे रंग किती प्रमाणात वापरावेत, याचे कोणतेही भान कामगारांना नव्हते.

६. अस्वच्छतेचे साम्राज्य आणि काळपट भिंती: दुकानाच्या भिंतींवर जाळे आणि जळमटे साचलेली होती, तर समोसे तळणाऱ्या ठिकाणी भिंतींवर तेलाचे काळे थर जमा झाले होते.

७. कामगारांची वैद्यकीय तपासणी नाही: येथे काम करणाऱ्या २५ ते ३० कामगारांची कोणतीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली नव्हती.

८. ड्रेनेजच्या शेजारी इडलीचे पीठ: सर्वात धक्कादायक म्हणजे, इडली तयार करण्यासाठी आंबवलेले पीठ चक्क उघड्यावर आणि सांडपाण्याच्या लाईनजवळ ठेवलेले आढळले.
Maharashtra TimesBMC FDA Action: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! मुंबई महापालिका मुख्यालयातील कॅन्टीन सील, काय कारण?
९. तंबाखूच्या पिचकाऱ्या खाद्यपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी कामगारांचे तंबाखूचे पुडे आढळले, तर भिंतींवर तंबाखू खाऊन थुंकल्याचे विदारक चित्र समोर आले.

१०. उघडी कचराकुंडी: कचराकुंडीवर कसलेही झाकण नव्हते, तसेच खिडक्यांना जाळ्या नसल्याने माशा आणि इतर कीटकांचा थेट वावर होता.

संशयित तेलाचे नमुने प्रयोगशाळेत रवाना

या कारवाईनंतर पथकाने पेढीतून दूषित झालेले तेल आणि वनस्पती तुपाचे नमुने जप्त केले असून ते अधिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे शहरातील इतर हॉटेल व्यावसायिक आणि मिठाई उत्पादकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा