Chhatrapati Sambhajinagar Kadepathar : ‘कडेपठारावरील मंदिराची स्थापत्य शैली, इथले स्तंभ बघता हे मंदिर १३व्या किंवा १४व्या शतकातील वाटते. शैलीच्या या मंदिरात मंदिराची नोंद राज्य पुरातत्व विभागाकडे नाही. ही असंरक्षित वास्तू आहे. या मंदिराचे संवर्धन व्हावे अशा सुचना लोकप्रतिनिधींनीही दिल्या होत्या. आम्ही मंदिराची पाहणी केली असून संवर्धनाचे अंदाजपत्रक तयार केले आहे’, असं राज्य पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालिका जया वाहणे यांनी म्हटलं आहे.

अत्यंत देखणा सभामंडप
येथील सातारा गावातील प्रसिद्ध खंडोबा मंदिरात भाविकांची कायम वर्दळ असते. खंडोबा मंदिर राज्य पुरातत्त्व विभागाचा संरक्षित वारसा असल्याने पुरातत्त्व विभागाने संवर्धनाचे काम हाती घेत अत्यंत देखणा सभामंडप बांधले, तसेच मंदिर संवर्धनाची इतर काम इथे सुरू आहेत. मात्र याच मंदिरापासून जेमतेम दहा-बारा किलोमीटरवर असलेले कडेपठारावरील खंडोबा मंदिर हे याही मंदिरापेक्षा जुने मंदिर असल्याचे अभ्यासक सांगतात. विशेष म्हणजे इथे खंडोबा, म्हाळसादेवी आणि बाणूची एकत्र मूर्ती आहे, जी इतरत्र आढळत नाही असे सांगितले जाते. या मंदिराचा उल्लेख निजामाच्या काळातही येतो.
Pune Crime : सगळ्यांसमोर ‘अंकलजी’ म्हणा, खोलीत ‘महाराज’ बोला! पुण्यातील भोंदूचा पर्दाफाश, 12 हजार चौ फुटांवर आलिशान बंगला, भुयार खोदण्याचा प्रयत्न
कडेपठार हे ठिकाण निसर्गरम्य असून पौष महिन्यात चंपाषष्टी नंतरच्या तिसऱ्या रविवारी यात्रा भरते. इथपर्यंत पोचायला रस्ता नसला, तरी भाविक व लोकप्रतिनिधी इथे आवर्जून येतात. संवर्धन आणि अपूर्ण माहिती यामुळे कडेपठारावरील निसर्गात लपलेले खंडोबा मंदिर पर्यटकांपासून दुरावले होते. मंदिराची पडझड झाली असून अवशेष विखुरलेले दिसतात. मंदिराचा विस्तार मोठा असला, तरी मंदिराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. मूळ रचनेतील मंदिर उद्ध्वस्त झाले. इथे केवळ सभामंडपाचा भाग शिल्लक दिसून येतो. हळूहळू भाविक, इतिहास अभ्यासक, लोकप्रतिनिधींकडून संवर्धनाच्या मागणीला जोर धरू लागली.
भाविकांकडून समाधान व्यक्त
राज्य पुरातत्त्व विभाग संरक्षित वारसा म्हणून या मंदिराची नोंद नसली तरीही राज्य पुरातत्त्व विभागाने दखल घेत मंदिराची पाहणी केली. ऐतिहासिक वारसा म्हणून या कडेपठार खंडोबा मंदिराचा जतन संवर्धन म्हणून पुरातत्व विभागाने संवर्धनाचा प्रस्ताव तयार असून हा प्रस्ताव पालकमंत्र्यांकडे सादर होणार आहे. यामुळे संवर्धन प्रक्रियेतला एक मार्ग खुला झाला आहे. त्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Smart Meter : महावितरणने जनजागृती करण्याची मागणी; नागरिकांचा अजूनही स्मार्ट मीटरला विरोध, नेमक्या त्यांच्या मागण्या काय?
स्थापत्यशैली वैशिष्ट्यपूर्ण
कडेपठारावरील खंडोबा मंदिर हेमाडपंती असले, तरी बीडचे कंकालेश्वर, केसापुरीचे मंदिर, महालक्ष्मी मंदिराप्रमाणे त्रिदल शैलीचे आहे. यात तीन गर्भगृहे असावीत. मंदिराची सीमाभिंत बघता मंदिराला दोन्ही बाजूंनी प्रवेश असावा. मंदिरासाठी इथलाच दगड वापरला गेला असावा,असे पुरातत्त्व विभागाचे म्हणणे आहे. मंदिराच्या मागे असलेले तसे म्हणजे पुष्करणी (बारव) आहे. पठारावरील नैसर्गिक उतारावरून पाणी अडवण्यासाठी हे तळे बांधले गेले असावे. मंदिरासमोर घट पल्लव रचनेतील मंदिर स्तंभ आहेत.

