Headlines

Chhatrapati Sambhajinagar 30 Year Old Komal More Ends her Life Harassed by her Laws and Husband; छळाला कंटाळून महिलेनं स्वत:ला संपवलं, चिमुकले आईच्या शोधात, तीन लेकरं मायेच्या छत्रछायेला पारखी; उपस्थितांचे डोळे पाणावले


Chhatrapati Sambhajinagar Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

Sambhajinagar Komal More Suicide
छत्रपती संभाजीनगर कोमल मोरे आत्महत्या प्रकरण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : ज्या घरात आनंदाने संसार थाटला, त्याच घरात एका 30 वर्षीय उच्चशिक्षित विवाहितेचा असा दुर्दैवी अन् करुण अंत होईल, असा विचारही तिच्या माहेरच्यांनी केला नव्हता. संगणक अभियंता असलेल्या पतीसह सासरच्या मंडळींच्या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून 30 वर्षीय विवाहितेनं आपलं जीवन संपवलं. ‘माझ्या बहिणीने आत्महत्या केली नसून, सासरच्या त्रासानेच तिचा बळी घेतला आहे’, असा संतप्त आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे 8 वर्षे आणि अवघ्या अडीच वर्षांची दोन चिमुकली मुले आईच्या मायेच्या छत्रछायेला कायमची पारखी झाली आहेत.

नेमकी घटना काय?

कोमल योगेश मोरे (वय 30, रा. बजाजनगर) असं मयत महिलेचं नाव आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कोमलचा विवाह 2016 मध्ये संगणक अभियंता योगेश मोरे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवस सर्वकाही ठीक चाललं होतं. मात्र, त्यानंतर सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू झाला, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास कोमलचे सासरे रेवनाथ मोरे यांनी कोमलच्या वडिलांना फोन करून ‘कोमल उठत नाहीये, ती बेशुद्ध आहे’, असं सांगितलं. ही बातमी ऐकताच कोमलचे वडील आणि भाऊ डॉ. कृष्णा पवार यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
Maharashtra TimesNashik Crime : दुसऱ्या बायकोचा जीव घेतला, आईला वाचवायला मध्ये पडलेल्या चिमुकल्यानेही प्राण गमावले, बापाचं टोकाचं पाऊल
धावतपळत बजाजनगर येथील घरी पोहोचलेल्या भावाने व वडिलांनी पाहिले तर समोरील दरवाजा बंद होता. मागच्या दरवाजाने आत जाऊन पाहिले असता, कोमल तिच्या खोलीत निस्तेज आणि बेशुद्धावस्थेत पडली होती. तिच्या अंगावर छळाच्या खुणा असून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आले, असा थेट आरोप कोमल यांच्या भावाने केला आहे.
Maharashtra TimesBMC Canteen : ताकाच्या ग्लासात माशी, भजीत प्लास्टिक धागा; मुंबई महापालिकेच्या कॅन्टीनमधील संतापजनक प्रकार

चिमुकल्यांचे अश्रू पाहावेना

आई निघून गेल्याचं भानही नसलेली 8 वर्षांची आणि अडीच वर्षांची दोन लहान मुले जेव्हा आई शोधत होते, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले. याप्रकरणी कोमलचा भाऊ डॉ. कृष्णा राजधर पवार (रा. वडगाव कोल्हाटी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आणि केलेल्या गंभीर आरोपांवरून वाळूज पोलिसांनी संगणक अभियंता पती योगेश मोरे, दीर (भाया) सचिन मोरे, सासरे रेवनाथ दौलत मोरे आणि सासू कांता मोरे यांच्याविरुद्ध कौटुंबिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलीस आता अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा