Chandrashekhar Bawankule: भंडारा भाजपमध्ये असलेली गटबाजी थांबवा, ती संपवा असे चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.
bhandara bjp(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, भंडारा: लोकसभा निवडणुकीत पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अतिआत्मविश्वास दिसून आला. काहीतरी गडबड असल्याचे दिसून आले. कार्यकर्ते त्यांच्या कामात कमी पडत होते आणि गटबाजी उदयास येत होती. भंडारा भाजपमधील गटबाजी लपून राहिलेली नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी ती संपवणे महत्त्वाचे आहे. तरच विजय मिळेल, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
भंडारा येथे गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या दिवाळी मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार परिणय फुके, माजी खासदार सुनील मेंढे, जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे आणि भाजप नेते जॅकी रावलानी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य: ‘शहरी नक्षलवाद हे नव्या युगातील सर्वात मोठं आव्हान, तर काँग्रेस अल्ट्रा लेफ्टिस्ट विचारांनी ग्रस्त’ बावनकुळे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये अतिआत्मविश्वास दिसून आला. पराभवाचा परिणाम सुनील मेंढे यांच्यावर झाला नाही, परंतु पक्षाचे नुकसान झाले. त्याचे परिणाम सर्वांना स्पष्ट आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी भीती निर्माण केली. यानंतर कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने विधानसभा निवडणूक लढविली. परिणामी, साकोलीमध्ये नाना पटोले यांचा केवळ २०८ मतांनी विजय झाला, असेही त्यांनी सांगितले.
कुणी नेता असल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा पत्नीला तिकीट मिळणार नाही . जर त्यांनी ५१ टक्के मतांची हमी दिली तरच पक्ष त्यांना तिकीट देईल. बावनकुळे यांनी सर्वांना पक्षातील गटबाजी टाळण्यासाठी शपथ घेण्याचे आवाहन केले . राज्य सरकारकडून आमदारांच्या निधीवाटपात दुजाभाव? विजय वडेट्टीवार यांचा धक्कादायक आरोप चारही नगरपरिषदा लढवण्याची तयारी भाजपने भंडारा, पवनी, साकोली आणि तुमसर या चारही नगरपरिषदांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयावर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले.
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा