Headlines

Ceiling Plaster Falls in 1 Crore Noida Flat While Son Was Standing Below Video Viral | १ करोडचा फ्लॅट पण प्लास्टर झोपडपट्टीसारखं, श्रीमंत सोसायटीमधील व्हिडीओ व्हायरल, मुलगा थोडक्यात वाचला


Noida Construction Quality: नोएडातील १ कोटींच्या फ्लॅटच्या छताचा प्लास्टर अचानक कोसळला. त्यावेळी एक लहान मुलगा खाली उभा होता. सुदैवानं तो वाचला. त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. बिल्डरकडे तक्रार केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरं मिळाल्याचा आरोपही तिने केला. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Noida apartment plaster collapse
(फोटो सौजन्य – akshitabansal604/Instagram)
घरांच्या किंमती आजच्या तारखेला गगनाला भिडल्या आहेत. शहरात चांगल्या ठिकाणी एखादा फ्लॅट घ्यायचा म्हटलं तर किमान ५०-६० लाख रुपये खर्च करण्याशिवाय पर्याय नाही. बरं, लाखो रुपये खर्च केल्यावर बांधकाम उत्तम दर्जाचं असावं अशी साधी अपेक्षा लोकं करतात. पण दुर्दैवानं तिथेही त्यांची फसवणूक होते. अन् हीच स्थिती दाखवणाऱ्या एका घरातील व्हिडीओ समोर आला आहे. १ कोटींच्या फ्लॅटची दुर्दशा पाहून तुम्ही देखील डोक्याला हात लावाल. छताचं प्लास्टर अचानक खाली पडलं आणि या प्रकरणी जेव्हा बिल्डरकडे तक्रार केली तेव्हा त्यांना म्हणे उडवाउडवीची उत्तरं मिळाली. चला पाहूया व्हायरल होणारा व्हिडीओ.

नेमकं घडलं तरी काय?

​ ​

हा व्हिडीओ akshitabansal604 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. नोएडातील गौर सिटी फर्स्ट एव्हेन्यूमध्ये राहणाऱ्या अक्षिता बन्सल यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या घराच्या छताचं प्लास्टर अचानक खाली पडल्याचं त्या सांगत आहेत. विशेष म्हणजे, प्लास्टर खाली पडताना त्यांचा मुलगा अगदी त्याच ठिकाणी उभा होता. सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. पण या प्रकरणातील लक्षवेधी बाब म्हणजे प्लास्टर पडण्यापूर्वी साधारणपणे आधी तडे जातात आणि मग ते खाली पडतं. पण इथे छतावर आधी कोणताही क्रॅक किंवा तडा दिसत नव्हता. ते अचानक खाली पडलं.

या प्लास्टरमधील सिमेंट सुद्धा हलक्या प्रतीचं असल्याचा आरोप त्या करत आहेत. कारण कोसळलेला प्लास्टर हातात घेऊन तो सहज तुटत असल्याचं त्यांनी व्हिडीओमध्ये दाखवलं आणि बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले. बरं, या प्रकरणी जेव्हा त्यांनी बिल्डरकडे तक्रार केली, तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळाल्याचं त्या सांगतात.

सुदैवानं मुलगा वाचला

​ ​

हा व्हिडीओ ७ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसंच अनेकांनी या व्हिडीओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी महिलेच्या मुलाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. तर कोणी ‘तुमचा मुलगा सुखरूप असेल अशी आशा आहे’, अशी प्रतिक्रिया दिली. असो, या प्रकरणी तुमचं काय मत आहे? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा